मी तुला मारून टाकीन!

जौनपूरमध्ये पत्नीच्या धमक्यांनी पती त्रस्त

    दिनांक :10-Nov-2025
Total Views |
जौनपूर,
Threats from wife in Jaunpur उत्तर प्रदेशातील जौनपूर जिल्ह्यातून एका धक्कादायक घटनेची माहिती समोर आली आहे. पत्नीने पतीला “मी तुला मारून टाकीन” अशी धमकी दिल्यानंतर,भीतीपोटी त्याने न्यायालयात प्रियकराशी पत्नीचे लग्न लावले. या निर्णयानंतर त्यांच्या पाच वर्षांच्या लग्नाचे रद्दीकरण करण्यात आले. या जोडप्याला एक चार वर्षांचा मुलगा आहे, जो आता वडिलांसोबत राहणार आहे.
 

Threats from wife in Jaunpur 
 
घटना शाहगंज तालुक्यातील तखा पश्चिम गावात घडली. ज्ञानचंद आणि रवीना यांचा जून २०२१ मध्ये हुसेनाबाद येथील विवाह झाला होता. सुरुवातीला सर्व काही ठीक चालले, परंतु २०२४ मध्ये रवीना आपल्या माहेरी असलेल्या प्रदीप कुमार गौतम या व्यक्तीच्या प्रेमात पडली आणि मोबाईलद्वारे नियमित संपर्क साधू लागली. पतीने विरोध केला तरी रवीना त्याच्याकडे ऐकली नाही.
 
 
ज्ञानचंद यांना रवीना यांच्या मोबाईलमध्ये तिच्या प्रियकराचे असंख्य फोटो सापडले. पत्नीने पतीला जीवे मारण्याची धमकी दिल्यानंतर, पती घाबरला. अनेक विचारविनिमयानंतर, त्यांनी शाहगंज तहसीलमधील एसडीएम न्यायालयात रवीना आणि तिच्या प्रियकराचे लग्न लावण्याचा निर्णय घेतला.