हनुमान नगरात तुळशी विवाह थाटात

    दिनांक :10-Nov-2025
Total Views |
नागपूर,
Hanuman Nagar तुरून भारतच्या उपक्रमांतर्गत, कार्तिकी एकादशीच्या शुभ मुहूर्तावर हनुमान नगरात योगायोग विवाह संस्था आणि गृहिणी समाज यांनी संयुक्त विद्यमाने तुळशी दामोदर विवाह संपन्न केला. संध्याकाळी साजशृंगार केलेल्या श्रीकृष्ण आणि तुळशीच्या विवाह विधी शास्त्रोक्त पद्धतीने पार पडल्या.
 
Hanuman Nagar
 
कार्यक्रमात योगायोगच्या संचालिका गौरी बेलन, सुप्रसिद्ध वक्ते अमोल पुसदकर आणि माजी महापौर कल्पना पांडे उपस्थित होते. विवाह संस्थेच्या व्यवस्थापक व नोंदणी प्रमुख यांच्यासह दक्षिण नागपूर प्रतिनिधींचे सहकार्य लाभले. Hanuman Nagar विशेष सत्कारात सर्व मंगलवेष परिधान केलेल्या दांपत्याचे गौरव करण्यात आले. कार्यक्रम प्रसाद वितरण आणि शांती मंत्राने संपन्न झाला.
 
सौजन्य: आशुतोष ठोंबरे, संपर्क मित्र