नवी दिल्ली,
rohits-viral-video भारतीय संघाचा ‘हिटमॅन’ म्हणून ओळखला जाणारा रोहित शर्मा मैदानावर जेव्हा फलंदाजी करतो, तेव्हा तो प्रतिस्पर्ध्यांच्या गोलंदाजांवर वादळासारखा तुटून पडतो. पण मैदानाबाहेरचा रोहित अगदी वेगळाच – मजेशीर, दिलखुलास आणि लोकांशी जुळून घेणारा आहे. सोशल मीडियावर वेळोवेळी त्याचे असे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात, ज्यातून त्याचा विनोदी स्वभाव आणि साधेपणा दिसून येतो.
अशाच एका नव्या व्हिडिओने आता पुन्हा सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. या व्हिडिओत रोहित शर्मा आपल्या खोलीच्या खिडकीबाहेर लग्नाचे फोटोशूट करणाऱ्या नवविवाहित जोडप्याला अशा अंदाजात शुभेच्छा देताना दिसतो की, पाहणाऱ्यांचेही हसू आवरत नाही. मिळालेल्या माहितीनुसार, हा व्हिडिओ रोहितच्या वर्कआऊट सेशनदरम्यानचा आहे. वर्कआऊट करताना त्याने बाहेर पाहिले असता, एका नवविवाहित जोडप्याचे फोटोशूट सुरू होते. rohits-viral-video आणि इथेच रोहितच्या मनात एक भन्नाट कल्पना आली. त्याने आपल्या स्पीकरवर क्लासिक बॉलिवूड गाण — ‘आज मेरे यार की शादी है’ — मोठ्या आवाजात लावलं आणि खिडकीतूनच गाण्यावर थिरकायला सुरुवात केली.
सौजन्य : सोशल मीडिया
अचानकच खिडकीतून नाचणारा भारतीय क्रिकेट संघाचा कप्तान पाहून ते जोडपंही थक्क झालं. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. “हा क्षण आयुष्यात एकदाच येतो!” असं त्या जोडप्याने हसत-हसत म्हटले. हा व्हिडिओ बघितल्यावर चाहत्यांना समजतं की, रोहित शर्मा केवळ क्रिकेटसाठीच नाही, तर आपल्या माणुसकीसाठी आणि साधेपणासाठीही लोकांच्या मनात का खास स्थान राखतो. rohits-viral-video दरम्यान, दक्षिण आफ्रिकेविरुद्धची तीन सामन्यांची वनडे मालिका 30 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. पहिला सामना रांचीमध्ये, तर उर्वरित दोन सामने रायपूर (3 डिसेंबर) आणि विशाखापट्टणम (6 डिसेंबर) येथे खेळले जातील. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत रोहितच्या जबरदस्त फॉर्मकडे पाहता, तो पुन्हा एकदा टीम इंडियाचा ‘मुख्य शस्त्र’ ठरणार आहे.