रब्बी अर्थसहाय्याची प्रतीक्षा कायम !

शेतकर्‍यांच्या अपेक्षांवर पाणी

    दिनांक :11-Nov-2025
Total Views |
कारंजा लाड, 
Waiting for Rabbinical Aid राज्य शासनाने शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी रब्बी हंगामातील बियाणे व खते खरेदीसाठी हेटरी १० हजार रुपये अर्थसहाय्य देण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय गत महिन्यात १२ ऑटोबर जारी करण्यात आला. मात्र, आज एक महिना उलटून गेला तरी शेतकर्‍यांच्या खात्यात एक रुपयाही जमा झाला नाही. परिणामी, रब्बी हंगाम सुरू असूनही शेतकर्‍यांची अर्थसहाय्याची प्रतीक्षा कायम आहे. खरीपातील अतिवृष्टी आणि उत्पादन घट यामुळे शेतकरी आधीच अडचणीत आहे. शासनाने रब्बी हंगामापूर्वी दिलेली आर्थिक मदत शेतकर्‍यांसाठी मोठा दिलासा ठरला असता. पण निधी न मिळाल्याने शेतकरी उसनवारी व सावकारीकडे वळला आहे.
 
 
Waiting for Rabbinical Aid
 
परिणामी शासन म्हणतंय १० हजार मिळतील पण शेतकर्‍यांच बँक पासबुक आजही शून्य दाखवतंय.असे व्यथित उद्गार शेतकरी व्यक्त करीत आहेत. प्रशासनिक सूत्रांच्या माहितीनुसार, शासन स्तरावर निधी मंजुरी पूर्ण झाली असली तरी वित्त विभागाकडून रक्कम जिल्ह्यांना पाठवण्यात झालेल्या विलंबामुळे वितरण सुरू होऊ शकलेले नाही. सर्व पात्र शेतकर्‍यांची नोंदणी व अर्ज प्रक्रिया पूर्ण झाली आहे. निधी प्राप्त होताच थेट खात्यावर रक्कम जमा केली जाईल.असे प्रशासनाचे म्हणणे आहे.दरम्यान, कारंजा तालुयात गहू, हरभरा, ज्वारी, आदी पिकांची पेरणी सुरू झाली आहे.
 
 
 
पण अर्थसहाय्य न मिळाल्याने शेतकरी खिशातूनच खर्च करत आहेत. बाजारात बियाणे व खतांचे दर वाढले असून एका एकराच्या पेरणीसाठी सरासरी ७ ते ९ हजार रुपयांचा खर्च येत आहे.शासनाने अर्थसहाय्याची घोषणा वेळेवर केली होती. मात्र निधी वेळेत उपलब्ध न झाल्याने शेतकर्‍यांचा आत्मविश्वास कमी होत आहे. शेतकर्‍यांच्या खिशाला मदत व्हावी यासाठी वितरण तातडीने होणे गरजेचे आहे. शासनाने घोषणा केली, जी. आर. काढला, बैठका झाल्या पण प्रत्यक्षात निधी नाही. त्यामुळे घोषणा करून काय उपयोग, जेव्हा हंगाम सुरू होऊनही पैसा मिळत नाही? असा सवाल शेतकरी विचारत आहेत. खरं तर, रब्बी हा खरीपानंतरचा नव्या उमेदीचा हंगाम असतो. पण आज या हंगामावर विलंब आणि प्रतीक्षेचं सावट आहे.
 
 
तातडीने निधी वितरण करावे
राज्य शासनाने जाहीर केलेल्या निर्णयाची त्वरित अंमलबजावणी करून निधी थेट शेतकर्‍यांच्या खात्यात जमा करणे अत्यावश्यक आहे. कारंजा तालुयात रब्बी हंगामाचा श्री गणेशा झाला असून गहू हरभर्‍याची पेरणी सुरू आहे त्याकरिता लागणार्‍या बियाणे व खतासाठी शेतकर्‍यांकडे पैसे उपलब्ध नसल्याने उसनवारी करून सावकाराच्या दारी जाण्याची वेळ शेतकर्‍यांवर आली आहे. त्यामुळे सरकारने रब्बी अर्थसहय्यची रक्कम तातडीने शेतकर्‍याच्या खात्यात जमा करावी.
बाबारावजी काळे, शेतकरी बांबर्डा