अभ्यंकर कन्या कनिष्ठ महाविद्यालयाचा खो-खो संघ राज्यस्तरावर

    दिनांक :12-Nov-2025
Total Views |
तभा वृत्तसेवा
यवतमाळ, 
abhyankar-girls-junior-college : क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने शिवाजी शिक्षण संस्था खल्लार येथे झालेल्या अमरावती विभागीय शालेय खो-खो स्पर्धा 19 वर्षे वयोगटांमध्ये अभ्यंकर कन्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालय संघाने विजय संपादन केला. त्यामुळे हा संघ राज्यस्तरासाठी पात्र ठरला आहे.
 
 
 
y12Nov-Kho-Kho
 
 
 
अभ्यंकर कन्या शाळेच्या संघाने प्रथम वाशिम संघाचा एक डाव चार गुणांनी पराभव करीत अंतिम सामन्यात धडक दिली. तर बुलढाणा संघाचा एक डाव तीन गुणांनी पराभव करून अभ्यंकर कन्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाने विजय संपादन केला.
 
 
या संघामध्ये सोनल सामुद्रे, समीक्षा खेत्री, आचल काळे, कोमल मडावी, अशिका ओंकार, श्रावणी गिरी, सलमा माहावत, वंशिका खरतडे, ययाती मडावी, परि खदरकर, हंसिका उमरे, रोशनी पेंदोर, दीपिका उमरे यांचा समावेश आहे. वरील संघ नाशिक येथे 15 ते 17 नोव्हेंबर रोजी होणाèया राज्यस्तर खो-खो स्पर्धेकरिता जाणार आहे.
 
 
विशेष म्हणजे, अभ्यंकर कन्या शाळेचा हा संघ गेल्या 33 वर्षापासून राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेमध्ये सहभागी होत आहे. वरील खेळाडू आपल्या यशाचे श्रेय वुमेन्स एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अ‍ॅड. एपी दर्डा, सचिव रमेश मुनोत, मुख्याध्यापक मोहना गंगमवार, उपमुख्याध्यापक व प्रशिक्षक अविनाश जोशी, क्रीडाशिक्षक संजय बट्टावार, पर्यवेक्षक प्रगती पराते यांना देतात.