वर्धा,
Administration ready for elections जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची घोषणा कधीही होऊ शकते. ही शयता लक्षात घेता जिल्हा प्रशासन गट व गणाच्या निवडणुकीच्या तयारीला लागले आहे. ग्रामीण भागातही निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय वातावरण तापू लागले आहे. जिल्हा परिषद अंतिम रचना जाहीर करण्यात आली आहे. यावर्षी जिल्हा परिषद अध्यक्षपद अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. त्याचप्रमाणे जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या गट-गणाच्या आरक्षणाची अंतिम यादीही जाहीर करण्यात आली आहे. जिल्ह्यातील ५२ जिल्हा परिषद आणि १०४ पंचायत समिती सदस्य पदांसाठी निवडणूक होणार आहे. मतदारांच्या सोयीसाठी प्रशासनाने ईव्हीएमही तयार ठेवली आहे.

गट व गणाच्या निवडणुकीत सुमारे १३०० मतदान केंद्रे राहणार आहे. जिपच्या ५२ गटांमध्ये ८ लाख ४० हजार १७१ मतदार आहेत. त्यामध्ये ४ लाख २४ हजार ३१४ पुरुष मतदार, ४ लाख १५ हजार ८५७ महिला मतदार आणि इतर वर्गातील २ मतदारांचा समावेश आहे. प्रशासनाने मतदार यादीच्या पुनरीक्षणाचे कार्यही पूर्ण केले आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वीच राजकीय पक्षांनी आपली रणनीती आखण्यास सुरूवात केली आहे. संभाव्य उमेदवार सक्रिय झाले असून त्यांच्याकडून जनसंपर्क वाढविण्यावर भर दिला जात आहे.
तालुकानिहाय गट अन् मतदारांची स्थिती
तालुका : गट : मतदार
आष्टी : ३ : ५६ हजार ५२७
आर्वी : ४ : ६५ हजार ९९५
कारंजा : ६ : ८८ हजार १७७
सेलू : ६ : ९१ हजार २५९
वर्धा : १४ : २,०३,४०१
समुद्रपूर : ६ : १ लाख ३ हजार ४०१
देवळी : ६ : ९६ हजार ४३२
हिंगणघाट : ७ : १लाख ८ हजार १६६