गुवाहाटी,
assam-new-army-base : सीमापार गुन्हेगारी वाढण्याची भीती, कट्टरपंथी गटांच्या कारवाया आणि बांगलादेशच्या काळजीवाहू सरकारने ईशान्य भारताला उर्वरित भारताशी जोडणाèया ‘चिकन नेक’ कॉरिडॉरवर ‘दबाव’ निर्माण करण्याचा कथित प्रयत्न केल्याच्या भीतीमुळे आसाममधील स्थापन केल्या जाणाèया लष्करी तळाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे.
अशा सुविधेमुळे सीमा सुरक्षा वाढेल आणि संबंधित अधिकाèयांना गुप्तचर माहिती वाढवण्यास मदत होईल, असे त्यांनी सांगितले. बांगलादेशच्या आंतरराष्ट्रीय सीमेपासून केवळ 40 किमी अंतरावर, भारतीय लष्कराकडून आसामच्या धुबरी जिल्ह्यातील बामुनीगाव येथे लचित बोरफुकन लष्करी तळ उभारला जात आहे. राज्याच्या पश्चिम क्षेत्रातील हा पहिलाच तळ आहे.
लष्कराच्या पूर्व कमांडचे जीओसी लेफ्टनंट जनरल आर. सी. तिवारी यांनी मागील आठवड्यात या लष्करी तळाची पायाभरणी केली. बांगलादेशातील परिस्थिती पाहता तळ स्थापन करण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे, असे याबाबत प्रतिक्रिया देताना सेवानिवृत्त ब्रिगेडियर रणजित कुमार बोरठाकूर यांनी सांगितले. यापूर्वी सर्वांत जवळचे लष्करी तळ हे पश्चिम बंगालमधील कूचबिहार आणि आसाममधील तामुलपूर येथील होते. मानवी असो अथवा तांत्रिक, येथील गुप्तचर यंत्रणेला धुबरी येथील तळामुळे बळ मिळाले, असे त्यांनी साघितले. या तळामुळे भारतीय लष्कराची कार्यक्षमता आणि पायाभूत क्षमता वाढणार असल्याचे संरक्षण विभागाचे प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल महेंद्र रावत यांनी सांगितले.