२६ जानेवारीला होता हल्ल्याचा कट! रेकीचा खुलासा

    दिनांक :12-Nov-2025
Total Views |
नवी दिल्ली,
Attack plot on January 26 दिल्लीतील लाल किल्ल्यावर २६ जानेवारी रोजी झालेल्या कारमध्ये स्फोटाची तयारी आधीच करण्यात आली होती आणि त्यासाठी लाल किल्ल्याची रेकी देखील केली गेली होती, असा धक्कादायक खुलासा डॉ. मुझम्मिल यांच्या चौकशीतून समोर आला आहे. दिल्लीच्या ऐतिहासिक लाल किल्ल्याजवळ सोमवारी झालेल्या या स्फोटाने शहरात हादरवून टाकले.

Attack plot on January 26
पोलिस आणि तपास यंत्रणांनी आतापर्यंत अनेक संशयितांना ताब्यात घेतले असून, या प्रकरणातील तीन मुख्य संशयितांमध्ये डॉ. मुझम्मिल, डॉ. आदिल अहमद दार आणि डॉ. उमर यांचा समावेश आहे. स्फोटाच्या वेळी डॉ. उमर मारले गेले असण्याची शक्यता आहे, तर डॉ. मुझम्मिल आणि डॉ. आदिल अहमद दार यांना अटक करण्यात आली आहे. चौकशीत उघडकीस आले आहे की डॉ. मुझम्मिल आणि डॉ. उमर यांनी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात लाल किल्ल्याची रेकी केली होती. ही माहिती मुझम्मिल यांच्या फोनच्या डंप डेटावरून मिळाली आहे.
तपास यंत्रणेला असेही समजले की त्यांच्या योजनेचा एक भाग २६ जानेवारी रोजी लाल किल्ल्यावर हल्ला करण्याचा होता, तसेच त्यांनी गर्दीच्या ठिकाणी हल्ल्याचा कट रचण्याचा विचारही केला होता. सोमवारी जम्म -काश्मीर आणि हरियाणा पोलिसांनी फरिदाबाद येथून २,९०० किलो अमोनियम नायट्रेट जप्त केले. काही तासांतच लाल किल्ल्याजवळ स्फोट घडला. पोलिसांच्या माहितीनुसार, डॉ. उमर हा जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवादी मॉड्यूलचा सदस्य होता, ज्यामध्ये डॉ. मुझम्मिल आणि डॉ. आदिल अहमद दार यांचा समावेश होता. या बॉम्बस्फोटात १३ लोक ठार झाले असून २१ जखमी आहेत, अनेकांची प्रकृती गंभीर आहे. जम्मू-काश्मीर पोलिसांनी हाफिज इश्तियाकला फरिदाबादहून श्रीनगरमध्ये नेले आहे. डॉ. मुझम्मिलने हाफिज इश्तियाककडून भाड्याने घेतलेल्या घरातील एका खोलीतून २५६३ किलो स्फोटके जप्त केली आहेत. एनआयए हाफिज इश्तियाकचीही चौकशी करत आहे.