तो तरुणीचा गळा चिरत होता...आणि लोक फक्त पाहत राहिले!

    दिनांक :12-Nov-2025
Total Views |
बालाघाट,
Balaghat girl murdered बालाघाट जिल्ह्यातील आमगाव फाटा परिसरात घडलेली ही घटना समाजाच्या संवेदनांना हादरवून गेली आहे. एका तरुणाने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या तरुणीला जोराने जमिनीवर फेकले, तिच्यावर पायाने दाब दिला आणि नंतर तिचा गळा क्रूरपणे चिरला. धक्कादायक म्हणजे, हे सगळं पाहत असताना डझनभर लोक फक्त उभे राहून मोबाईलने व्हिडिओ शूट करत होते. पण मदतीला कोणीही पुढे आले नाही. त्या तरुणीचा जागीच मृत्यू झाला. ही भयंकर घटना बैहार पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. मृत तरुणीचे नाव रितू भांडारकर असून ती एका फर्निचरच्या दुकानात काम करत होती. रोजप्रमाणे बस पकडण्यासाठी रस्त्याच्या कडेला उभी होती. त्याच वेळी रोशन धुर्वे नावाचा तरुण तिथे आला. दोघांमध्ये काही वेळ वाद झाला आणि अचानक रोशनने खिशातून चाकू काढला. रितूवर वारंवार प्राणघातक हल्ला करत तिला जमिनीवर पाडले. त्यानंतर तिचा गळा चिरून खात्री केली की ती मेली आहे, आणि स्वतः बेशुद्ध पडला.
 
 

Balaghat girl murdered  
साक्षीदारांच्या मते, जवळपास १५-२० लोक हे दृश्य पाहत होते, पण कुणीही त्या मुलीच्या मदतीला धावून आले नाही. आरोपीच्या हातात चाकू असल्याने भीतीमुळे लोक थिजून गेले. काहींनी हा प्रसंग कॅमेऱ्यात टिपला आणि व्हिडिओ आता सोशल मीडियावर वेगाने पसरतो आहे. त्या व्हिडिओत रोशन म्हणताना दिसतो की, “तिने माझा विश्वासघात केला, मी तिला जाऊ देणार नाही.” लोक त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत होते, पण त्याने कोणाचेही ऐकले नाही. पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत समोर आले आहे की, रोशन आणि रितू यांची ओळख पाच वर्षांपासून होती. अलीकडेच रितूने त्याच्याशी बोलणे बंद केले होते, याचाच राग मनात धरून त्याने हत्येचा कट रचला. मंगळवारी सकाळी तो मोटारसायकलवरून तिला भेटायला आला होता. काही वेळ संवादानंतर त्याने थेट चाकूने हल्ला केला. घटनेनंतर बैहार पोलिस आणि एफएसएल टीम घटनास्थळी दाखल झाली. रक्ताने माखलेला चाकू, दोघांचे मोबाईल आणि रितूची बॅग पोलिसांनी जप्त केली आहे. आरोपीला बेशुद्ध अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.