सांगलीत 'मुळशी पॅटर्न'; वाढदिवसाच्या दिवशीच दलित महासंघाच्या अध्यक्षांची हत्या

    दिनांक :12-Nov-2025
Total Views |
सांगली, 
dalit-federation-president-murdered महाराष्ट्र दलित महासंघाचे अध्यक्ष उत्तम मोहिते यांची त्यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमादरम्यान निर्दयपणे हत्या करण्यात आली. प्राथमिक माहितीनुसार, मोहिते यांच्यावर धारदार शस्त्राने पोटात वार करण्यात आला, ज्यामुळे त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
 
dalit-federation-president-murdered
 
या भीषण घटनेनंतर परिसरात संतापाचे वातावरण पसरले. हल्लेखोर शाहरुख शेख उर्फ शेर्या याला जमावाने पकडून चोप दिला, ज्यात त्याचा मृत्यू झाला. या दुहेरी हत्याकांडामुळे सांगली शहरात तणाव निर्माण झाला आहे. घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग आणि सांगली पोलीस ठाण्याच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि सखोल तपास सुरू केला. दोन्ही मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात येत असून पोलिसांनी साक्षीदारांचे जबाब नोंदवणे आणि सीसीटीव्ही फुटेज तपासणे सुरू केले आहे. उत्तम मोहिते हे सांगलीतील दलित महासंघाचे सक्रिय आणि प्रभावी नेते म्हणून ओळखले जात होते. ते सामाजिक चळवळींमध्येही आघाडीवर होते. त्यांच्या मृत्यूनंतर समर्थकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला असून, शहरात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला आहे. dalit-federation-president-murdered पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, वाढदिवस समारंभात उपस्थित असलेल्या काही व्यक्तींना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. या दुहेरी हत्येमागील कारणांचा शोध घेण्यासाठी पोलीस सर्व बाजूंनी तपास करत असून, शहरातील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.