कारंजा (घा.),
Demand for sports complex एकेकाळी खर्या क्रीडा प्रेमींसाठी ओळखले जाणारे शहर आता मैदानाअभावी ओसाड आहे. जिल्ह्यातील इतर तालुयांमध्ये क्रीडा संकुल उभारली आहे. मात्र, कारंजा शहर अजूनही या सुविधांपासून वंचित आहे. त्यामुळे आम्ही खेळायचे तरी कुठे, असा संतप्त सवाल शहरातील खेळाडू, विद्यार्थी व क्रीडाप्रेमिंनी उपस्थित केला आहे.
काही वर्षांपूर्वी तत्कालीन पालकमंत्री सुनील केदार यांनी कारंजा येथे क्रीडा संकुल उभारणीसाठीचे आश्वासन दिले होते. परंतु, क्रीडा संकुलाला जागा उपलब्ध करून न दिल्यामुळे क्रीडा संकुल होऊ शकले नाही. तालुयातील अनेक खेळाडू राज्यस्तर, आंतरराष्ट्रीय स्तरावरापर्यंत पोहचले आहे. अनेक वर्ष खेळाडूंनी सराव करून जिल्हा आणि राज्यस्तरावर नावलौकिक मिळवला. कारंजासाठी क्रीडा संकुल उभारण्याचा विषय गेल्या अनेक वर्षे चर्चेत आहे. याबाबत अनेक बैठका झाल्या. जागा पाहणी सुरू आहे. मात्र, अद्यापही जागा निश्चित झाली नाही. फत नगरपंचायत पदाधिकार्यांकडून पोकळ घोषणा दिल्या गेल्या, मात्र प्रत्यक्षात काहीच घडले नाही. शहरात क्रीडा संकुल नसल्यामुळे अनेक युवकांना नोकरी व क्रीडा क्षेत्रातील संधी गमवावी लागतात. ही अतिशय खेदजनक बाब आहे. कारंजा शहराला हकाचे क्रीडा संकुल मिळावे जेणेकरून ग्रामीण भागाच्या विद्यार्थ्यांना सुद्धा त्याचा मोठ्या प्रमाणात फायदा होईल व आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू निर्माण होऊन शहरासह तालुयाचे नाव लौकिक होऊ शकेल, अशी अपेक्षा सामाजिक कार्यकर्ते संजय नागापुरे यांनी व्यत केली.
क्रीडापटूंची कुचंबना
कारंजा नगरपंचायतला अजूनपर्यंत हकाचं क्रीडा संकुल नाही, ही मोठी शोकांतिका आहे. यामुळे लहान मुलांमध्ये मैदानी खेळाची आवड कमी होत असून युवकांमध्ये शारीरिक तंदुरुस्तीचा अभाव जाणवतो आहे. अनेक लहान विद्यार्थ्यांमध्ये खेळाचे कौशल्य आहे. परंतु, क्रीडा संकुल नसल्यामुळे हे विद्यार्थी मैदानी खेळांपासून वंचित राहत असून क्रीटापटूंची कुचंबना होत आहे, अशी प्रतिक्रीया व्हॉलीबॉल प्रशिक्षक दिलीप जसुतकर यांनी दिली.