‘दुर्गोत्सव’ ची विश्वविक्रमाला गवसणी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वाक्षरीचे प्रमाणपत्र वितरित

    दिनांक :12-Nov-2025
Total Views |
नागपूर,
devendra-fadnavis : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) अंतर्गत घेण्यात आलेल्या गड-दुर्गांबाबत ‘अमृत २०२५’ उपक्रमाच्या अभूतपूर्व यशाने विश्व विक्रमाला गवसणी घातली. महाराष्ट्रातील निवडक गड आणि दुर्गांच्या लहान दिवाळीच्या निमित्ताने आजही निवडक घरोघरी लहान मुले व हौशी व्यक्ती साकारतात.
 

cm 
 
छत्रपती शिवाजी महाराजांना विश्वविक्रमी मानवंदना देण्याच्या उद्देशाने घेतलेल्या दुर्गोत्सव स्पर्धेत विक्रमी संख्येने लोकांनी सहभाग घेतला. मानवी हातांनी तयार केलेल्या प्रतिकृतींचा सर्वात मोठा डिजीटल फोटो या श्रेणीमध्ये गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये याची नोंद घेऊन अमृतला प्रमाणपत्र हस्तांतरीत केले.
 
 
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गड-दुर्ग किल्ल्यांसदर्भात लोकसहभागातून अमृतचा हा पहिला सन्मानास पात्र ठरलेला उपक्रम आहे. अमृतचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांनी या विश्व विक्रमाचे प्रमाणपत्र स्वीकारले. अबालवृध्दांसह महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून याचबरोबर राज्ये, अमेरिका, इंग्लंड, आखाती देशातून याला प्रतिसादामुळे याला लोकोत्सवाचे स्वरुप प्राप्त झाले. सहभागीतांना अमृत मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वाक्षरीचे प्रमाणपत्र वितरित केले जात आहेत.