दिग्रस तालुक्यात अवतरला, शिवकालीन इतिहास

शिवतेज किल्लोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद

    दिनांक :12-Nov-2025
Total Views |
तभा वृत्तसेवा
दिग्रस, 
fort-festival : शहरासह तालुक्यातील तुपटाकळी, सावंगा (बु), बेलोरा, चिंचपात्र, लाख (रा.) तसेच लगतच्या वाशीम जिल्ह्यातील वाई, गौळ व पोहरादेवी येथील स्पर्धकांनी ‘किल्ला बनवा’ या स्पर्धेत सहभागी घेऊ उस्फूर्त प्रतिसाद दिला.
 
 

y12Nov-Paleshwar 
 
 
 
नुकतेच युनेस्कोने जागतिक वारसा यादीमध्ये शिवरायांच्या 12 किल्ल्यांना स्थान दिल्याने स्पर्धकांनी यातील किल्ल्यांच्या प्रतिकृती बनवण्यावर भर दिल्याचे दिसून आले. यावेळी प्रतापगड, सिंधुदुर्ग, शिवनेरी, सिंहगड, मुरुड, जंजिरा, तोरणा, जिंजी, राजगड, रायगड, लोहगड व पद्मदुर्ग यांच्या हुबेहूब संपूर्ण माहितीसह प्रतिकृती उभारल्याने दिग्रस तालुक्यात शिवकालीन इतिहासाला उजाळा मिळाला.
 
 
किल्ला परीक्षण माजी शिक्षणाधिकारी प्रमोद सूर्यवंशी, माजी विस्तार अधिकारी विकास घाटगे, प्रा. अशोक तायडे, प्रा. शंकर भगत, किरण बारसे, सुनील पद्मावार, अभियंता संजय निरपासे, गजानन इंगळे, रामेश्वर नक्षणे, दीपक माहूरकर, रेवन वानखडे, स्नेहा चिंतावार यांनी केले.
 
 
स्पर्धेसाठी शिवतेज किल्लोत्सवाचे संयोजक संतोष झाडे, संजीव लोखंडे, वसंत खोडके, सुशील घोलप, पांडुरंग दारोळकर, माणिक मुनेश्वर, मनिष जाधव, चेतन श्रीवास, अमोल राठोड, अमोल झरकर, संदीप झाडे यांनी पुढाकार घेतला.