नागपूर,
diwali-gathering : एमआयडीसी इंडस्ट्रीज असोसिएशनच्या वतीने सिव्हिल लाईन्स येथील सी.पी. क्लब लॉन येथे दिवाळी मिलन कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी पोलिस आयुक्त डॉ. रविंद्र कुमार सिंगल प्रमुख अतिथी म्हणून तर व्यापारी आघाडीचे सदस्य , प्रमुख व्यापारी आणि संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. विविध सांस्कृतिक कार्यक्रमासह मनोरंजनाचे कार्यक्रम घेण्यात आले. निरोगी जीवनशैली राखण्याचे महत्त्व पोलिस आयुक्तांनी विशद केले. उद्योग क्षेत्रातील भेडसावणार्या समस्या सोडवण्यासाठी औद्योगिक संघटनांच्या प्रतिनिधींसोबत सहकार्य कायम राखण्याचे आवाहन एमआयएचे अध्यक्ष पी. मोहन यांनी केले.