आचारसंहितेमुळे प्राध्यापकांची पदोन्नती थांबवू नका!

- विद्यापीठ शिक्षण मंचाची मागणी

    दिनांक :12-Nov-2025
Total Views |
नागपूर, 
nagpur-news स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आचारसंहितेमुळे करिअर अॅडव्हान्स स्कीम अंतर्गत प्राध्यापकांच्या पदोन्नती प्रक्रिया थांबविण्यात आल्या आहेत. ही कारवाई अन्यायकारक असून, प्राध्यापकांच्या स्थाननिश्चितीवर आचारसंहितेचा परिणाम होऊ नये, अशी मागणी नागपूर विद्यापीठ शिक्षण मंचने केली आहे.
 
 
nagpur-news
 
अध्यक्ष डॉ. कल्पना पांडे आणि महामंत्री डॉ. सतीश चाफले यांच्या नेतृत्वात शिक्षण मंचाच्या प्रतिनिधींनी सहसंचालक आणि जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले. त्यांनी स्पष्ट केले की, कॅस अंतर्गत होणारी पदोन्नती ही नव्याने नियुक्ती नसून, सेवाकाळातील नैसर्गिक प्रक्रिया आहे. त्यामुळे ती आचारसंहितेच्या कक्षेत येत नाही. शिक्षण मंचाने म्हटले आहे की, या प्रक्रियेला विलंब झाल्यास अनेक प्राध्यापकांचे आर्थिक नुकसान होईल. nagpur-news पदोन्नती ही देय दिनांकापासून लागू होत असली तरी आर्थिक लाभ पुढे मिळतो. त्यामुळे निवडणूक कारणास्तव ती थांबविणे अन्यायकारक आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षण मंचाने सहसंचालकांना मागणी केली की, प्राध्यापकांच्या स्थाननिश्चितीच्या फाइल प्रक्रिया सुरु ठेवून, आर्थिक लाभ आचारसंहिता संपल्यानंतर त्वरित द्यावेत. निवेदन देताना डॉ. दत्ता वाटमोडे, डॉ. पांडुरंग डांगे, डॉ. योगेश भुते, डॉ. शशी रोकडे, डॉ. तुषार चौधरी उपस्थित होते. सहसंचालक व जिल्हाधिकारी कार्यालयाकडून या प्रकरणावर वरिष्ठ पातळीवर चर्चा करून सकारात्मक तोडगा काढला जाईल, असे आश्वासन देण्यात आले.