फार्मा कंपनीत स्फोट, 3 जणांचा मृत्यू, 24 जखमी

गुजरातच्या भरूचमध्ये बॉयलर फुटल्याने घटना

    दिनांक :12-Nov-2025
Total Views |
भरूच, 
Explosion in pharma company : गुजरातमधील भरूच जिल्ह्यातील एमआयडीसी औद्योगिक क्षेत्रातील एका फार्मा कंपनीत मंगळवारी रात्री उशिरा झालेल्या स्फोटात तीन जणांचा मृत्यू झाला, तर 24 कर्मचारी जखमी झाले. जखमींना भरूचमधील विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यापैकी पाच कर्मचाèयांची प्रकृती गंभीर आहे.
 
 
 
bharuch
 
 
 
एका पोलिस अधिकाèयाने सांगितले की,सायखा गावाजवळील विशाल फार्मा या कंपनीत बॉयलरचा स्फोट झाला आणि त्यानंतर आग भडकली. स्फोट इतका जोरदार होता की त्यामुळे जवळच्या चार कंपन्यांचे नुकसान झाले. या घटनेत तीन कर्मचाèयांचा जागीच मृत्यू झाला, तर 24 जण जखमी आहे. घटनास्थळी बुधवारीदेखील बचाव आणि मदत कार्य सुरू आहे, ढिगारा हटवण्याचे काम सुरू असून मृतकांची संख्या वाढू शकते. या प्रकरणी कंपनीच्या संचालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.