स्मशानात जातो, चुटकी वाजवतो अन् भूतबाधा काळतो, कोल्हापुरातील भोंदूगिरीचा VIDEO
दिनांक :12-Nov-2025
Total Views |
कोल्हापूर,
kolhapur-viral-video कोल्हापूर जिल्ह्यात स्मशानभूमीत अघोरी पूजा, करणी आणि भूतबाधा काढण्याचे धक्कादायक प्रकार उघडकीस आले असून, त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. हे प्रकार पुरोगामी महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळिमा फासणारे असल्याने एकच खळबळ उडाली आहे.
सौजन्य : सोशल मीडिया
घडामोडी आणि प्रतिक्रिया:
या भोंदूगिरीच्या जाळ्यात अनेक नागरिक अडकले असून, त्यांच्यात भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी या व्हायरल व्हिडिओंची दखल घेतली असून, त्यातील व्यक्तींची ओळख पटवून संबंधित लोकांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. kolhapur-viral-video अंधश्रद्धा निर्मूलन समितीने नागरिकांना अशा मांत्रिकांच्या जाळ्यात न अडकता, मानसिक समस्या असल्यास डॉक्टरांकडे उपचार घेण्याचे आवाहन केले आहे. या घटनेमुळे कोल्हापूर जिल्ह्यात अंधश्रद्धेचे वाढते प्रमाण आणि भोंदूबाबांचा सुळसुळाट पुन्हा एकदा समोर आला आहे. पोलीस आणि प्रशासनाने यावर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.