तांत्रिक अडचणींमुळे शेकडो उड्डाणांवर परिणाम

    दिनांक :12-Nov-2025
Total Views |
रेल्वे स्टेशनसोबतच विमानतळावर हाय अलर्ट कायम
सर्वत्र कडक सुरक्षा व्यवस्था
विलंबचा प्रवाशांना फटका
सीआयएसएफ आणि श्वान पथके सतर्क
क्विक रिअ‍ॅक्शन टीम्सकडून गस्त
नागपूर,
hundreds-of-flights-affected-in-nagpur सोमवारी दिल्लीत झालेल्या बॉम्बस्फोटानंतर नागपूरच्या डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर सर्वत्र कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. हाय अलर्ट घोषित करण्यात आल्यामुळे दोन दिवसांपासून विमानतळावरील सर्व प्रवाशांची तपासणी अधिक कडकपणे केल्या जात आहे. नागपूर विमानतळाप्रमाणेच मध्यवर्ती रेल्वेस्थानकावरील सुरक्षा यंत्रणा पूर्णतः सतर्क असून गस्त, तपासणी आणि श्वान पथकांच्या माध्यमातून तपासणी केल्या जात आहे. सीआयएसएफ, श्वान पथक आणि कर्मचार्‍यांची संख्या वाढवली असून प्रत्येक प्रवाशांच्या हालचालींवर लक्ष ठेवल्या जात आहे.

hundreds-of-flights-affected-in-nagpur 
 
दररोज काही विमानांना उशिर
दिल्ली विमानतळावर तांत्रिक अडचणींमुळे शेकडो उड्डाणांवर परिणाम झाला असून दररोज काही विमानांना उशिर होत आहे. याशिवाय उड्डाण रद्द होणे आणि विलंब होण्याच्या समस्या सातत्याने वाढत असल्याने प्रवाशांना फटका बसला आहे. एकीकडे नागपूर विमानतळावरून येणार्‍या जाणार्‍या प्रवाशांच्या तपासणीसाठी वेळ जात आहे. hundreds-of-flights-affected-in-nagpur तर दुसरीकडे अनेक उड्डाणांना उशीर झाल्याने प्रवाशांना गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली ही परिस्थिती प्रवाशांच्या प्रवास नियोजनावर परिणाम करत आहे.
परतीच्या उड्डाणांवरही परिणाम
विमान प्रवाशांनी उड्डाणाच्या नियोजित वेळेच्या किमान दोन तास आधी विमानतळावर पोहोचण्याचा सल्ला दिला आहे. तसेच, आणि ओळखपत्र तपासणीसाठी आवश्यक कागदपत्रे तयार ठेवावीत, असे आवाहन विमानतळ प्राधिकरणाने करण्यात आले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर गत दोन दिवसांपासून काही विमान उशिरा येत असल्याने प्रवाशांना प्रतिक्षा करावी लागत आहे. बुधवारी सुध्दा काही विमान उशिरा पोहोचले. परतीच्या उड्डाणांवरही परिणाम झाला असून, पुढील काही दिवसपर्यंत प्रवाशांना विलंबचा फटका करावा लागणार आहे. उत्तरेकडील भागात थंडीच्या लाटेमुळे धुके निर्माण झाल्याने काही विमानांना उशिर होत आहे.
प्रवाशांचे नियोजन विस्कळीत
मुख्यत: मुंबई, दिल्ली, पुणे, गोवा आणि कोलकाता, उत्तर भारतातील उड्डाणांना उशीर होत आहे. hundreds-of-flights-affected-in-nagpur काही उड्डाणांना उशीर झाल्याने प्रवाशांचे नियोजन विस्कळीत झाले आहे. रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षेचे स्तरी सुरक्षा ठेवण्यात आली आहे. विमानतळ परिसरात सीआयएसएफ आणि स्थानिक पोलिस दलाच्या संयुक्त पथकांनी सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतल्या जात आहे. विशेषत: धावपट्टी आणि हँगर परिसरात गस्त वाढवली असून प्रवाशांच्या हँडबॅग्स आणि लगेजची तपासणी, तर बाह्य परिसरात पार्किंग आणि आगमन व निर्गमन रस्त्यांवर वाहन तपासणी केल्या जात आहे. सुरक्षा दलांच्या रिअ‍ॅक्शन टीम्स सतत गस्त घालत असून, संशयास्पद हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. श्वान पथकांचे सतत चेकिंग सुरू आहे. विमानतळावर करणार्‍या प्रत्येक वाहनाची तपासणी केली जात आहे.