प्रलंबित विषयांवर महत्त्वपूर्ण बैठक

    दिनांक :12-Nov-2025
Total Views |
कारंजा लाड,
Important meeting on pending issues तालुक्यातील धामणी खडी येथील सत्तरसावंगा बॅरेजेस संदर्भातील प्रलंबित विषयांवर तोडगा काढण्यासाठी १० नोव्हेंबर रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती येथे आमदार सईताई डहाके, देवव्रत डहाके यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. या बैठकीत संबंधित विभागांचे अधिकारी तसेच स्थानिक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीदरम्यान बॅरेजेस प्रकल्पाशी निगडित तांत्रिक, प्रशासकीय आणि आर्थिक बाबींचा सविस्तर आढावा घेण्यात आला. प्रकल्पाच्या अंमलबजावणीतील अडथळे, प्रलंबित कामे, तसेच निधी वितरणासंबंधी विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली.
 

Important meeting on pending issues 
 
 
संबंधित अधिकार्‍यांकडून सध्याच्या कामकाजाची माहिती सादर करण्यात आली आणि पुढील टप्प्यांसाठी आवश्यक नियोजनावर विचारविनिमय झाला. शेतकर्‍यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध होण्याच्या नियोजनावर विशेष भर देण्यात आला. तसेच प्रकल्पाच्या प्रगतीला गती देण्यासाठी प्रलंबित असलेल्या जमिनीची मोजणी येत्या १५ दिवसांत पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचना अधिकार्‍यांना देण्यात आल्या. या बैठकीमुळे बॅरेज प्रकल्पाशी संबंधित शेतकर्‍यांमध्ये सकारात्मक अपेक्षा निर्माण झाल्या असून, प्रकल्पाची अंमलबजावणी गतीमान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.