अंधाऱ्या गुहेत 1.10 लाख कोळ्यांचं भव्य ‘जालमहल’ video

शास्त्रज्ञांनाही थक्क करणारा शोध

    दिनांक :12-Nov-2025
Total Views |
अथेन्स
Jalmahal of spiders अल्बानिया-ग्रीस सीमेजवळील गुहेत जगातील सर्वात मोठं कोळी जाळं आढळलं आहे. या अद्भुत जाळ्यात 1.10 लाखांहून अधिक कोळ्या राहत आहेत, ज्यात दोन वेगवेगळ्या प्रजातींचे हजारो कोळ्या एकत्र विणलेले आहेत. ‘सल्फर केव्ह’या गुहेत हे जाळ सुमारे 1140 चौरस फूट (100 चौरस मीटर) क्षेत्रात पसरलेले आहे. यात 69,000 घरगुती कोळ्या आणि 42,000 ड्वार्फ वीव्हर स्पायडर्स राहतात, जणू एक संपूर्ण “कोळी शहर” तयार झालेले आहे. संशोधकांसाठी ही घटना अत्यंत अद्भुत आहे कारण हे जाळ अशा ठिकाणी आहे जिथे सूर्यप्रकाश पोहोचत नाही आणि हवेतील हायड्रोजन सल्फाइड गॅसचे प्रमाण इतकं जास्त आहे की इतर जीवांसाठी ते प्राणघातक आहे, तरीही हजारो कोळ्या त्या विषारी वातावरणात निर्विघ्न जगत आहेत. गुहेतील हे जाळ प्रवेशद्वारापासून सुमारे 50 मीटर आत, कायम अंधारात पसरलेले आहे.
 
 
Jalmahal of spiders
हा शोध ‘सबटेरेनियन बायोलॉजी’ नामांकित जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे. संशोधकांना यामध्ये विशेष आवडले की या गुहेत दोन वेगवेगळ्या कोळी प्रजाती एकत्र राहतात आणि जाळं विणतात. मुख्य संशोधक इस्तवान यूराक (Istvan Urak), जे ट्रान्सिल्वेनियातील सेपिएंटिया हंगेरियन युनिव्हर्सिटी ऑफ रोमानियामध्ये बायोलॉजीचे असोसिएट प्रोफेसर आहेत, यांनी सांगितले, “तो क्षण भयाचा नव्हता, तर आश्चर्य आणि आदराचा होता. गुहेतील कोळ्या ‘मिजेस’नावाच्या सूक्ष्म कीटकांवर उपजीविका करतात, जे सल्फर खाणाऱ्या सूक्ष्मजीवांवर अवलंबून असतात. म्हणजे या संपूर्ण गुहेचा फूड चेन सल्फरवर आधारित आहे. संशोधकांनी असेही आढळले की गुहेतील कोळ्यांचा मायक्रोबायोम बाहेरील कोळ्यांपेक्षा खूप कमी विविधतेचा आहे आणि जेनेटिकलीही ते बाहेरील नातलग प्रजातींपेक्षा वेगळे झाले आहेत, ज्यामुळे त्यांनी अंधाऱ्या आणि विषारी वातावरणाशी स्वतःला पूर्णतः जुळवले आहे.
 
 
हा ‘जालमहल’ सर्वप्रथम 2022 मध्ये चेक स्पेलिओलॉजिकल सोसायटीच्या गुहा-विशेषज्ञांनी शोधला होता. 2024 मध्ये आंतरराष्ट्रीय वैज्ञानिकांच्या टीमने त्या ठिकाणी भेट देऊन नमुने गोळा केले आणि अधिकृत वैज्ञानिक पुष्टी मिळाली. हा शोध कोळी संशोधनासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरतो कारण यामध्ये दोन प्रजाती एकत्र राहून जाळं विणत असल्याचे पहिल्यांदाच स्पष्ट झाले आहे.