कडक इशारा! थंडीचा कडाका, पावसाची शक्यता

    दिनांक :12-Nov-2025
Total Views |
मुंबई,
Maharashtra cold wave मागील काही दिवसांपासून राज्यासह देशभरातील हवामानात सतत बदल होताना दिसत आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात मुसळधार पावसाने वातावरण थोडे थंड केले, तर सध्या अनेक भागांत कडाक्याची थंडी पडत आहे. काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू असून, हवामानातील या बदलामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
 

Maharashtra cold wave  
भारतीय हवामान विभागाने (IMD) पुढील पाच दिवसांसाठी चंदीगड, हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये थंडीवाढीचा इशारा दिला आहे. याचबरोबर महाराष्ट्रातही किमान तापमानात घट झाल्यामुळे थंडीचा कडाका वाढला आहे. धुळे, जळगाव, निफाड, नाशिक, परभणी आणि जेऊरसारख्या भागात थंडी अधिक जाणवेल, असे हवामान खात्याचे अधिकारी सांगत आहेत.
 
 
केरळ आणि Maharashtra cold wave  तामिळनाडूच्या काही भागांत हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे, कारण केरळच्या किनाऱ्याजवळ अरबी समुद्रात १.५ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. पुण्यात गेल्या दोन-तीन दिवसांपासून कडाक्याची थंडी जाणवत आहे. शहरातील किमान तापमान आता १३.४ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले असून, पुढील काही दिवसांत हे आणखी कमी होण्याची शक्यता आहे.हवामान खात्याच्या अहवालानुसार, उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्यातील हवामानात अधिक थंडावा जाणवेल. १२ आणि १३ नोव्हेंबर रोजी राज्यातील काही भागांत थंडीची लाट जाणवेल, त्यामुळे नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विशेषतः लहान मुले, वृद्ध नागरिक आणि आजारपणामुळे असुरक्षित लोकांना थंडीत नुकसान होऊ नये म्हणून योग्य तयारी करण्यास सांगितले आहे.राज्यातील थंडी आणि पावसामुळे शेतकरी, कामगार आणि सामान्य नागरिकांना दैनंदिन जीवनात अडचणींचा सामना करावा लागू शकतो. हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यामुळे नागरिकांनी गरम कपडे, हिटर आणि उबदार जेवणाचा विशेष विचार करावा, असा सल्लाही दिला आहे.