मुल्ला,
Mulla Animal Hospital देवरी तालुक्यातील मुल्ला येथील पशु चिकित्सालय परिसरातील वसाहतीत अधिकारी, कर्मचारी यांच्े वास्तव्य नसल्याने यथील चिकीत्सालय व निवासी इमारती भग्नावस्थेत आहेत. येथील पशु चिकीत्सालयात वर्षभरापासुन खाजगी विद्युत कंत्राटदारांचा ठिय्या आहे. खाजगी इसमांचा शासकीय पशुसंवर्धनाच्या इमारतीत अधिवास निर्माण झाल्याने पशुसंवर्धनाच्या अधिकारी व कर्मचारी यांचा चिकित्सालयाच्या इमारतींवरील दुर्लक्ष की पाठबळ? असा पश्न परिसरातील नागरिकांत निर्माण झाला आहे.

मुल्लासह परिसरातील पशुपालकांच्या पशुधनाचे आरोग्य सुदृढ राहावे या उद्देशाने येथे सन 2016-17 या वर्षात शासनाने कोट्यवधींचा निधी खर्चून पशु चिकित्सालयाची भव्य इमारत साकारली. यानंतर चिकीत्सक व कर्मचार्यांसाठी असलेल्या जीर्ण निवासस्थानाची दुरुस्ती करण्यात आली होती. निर्मित चिकीत्सालयाच्या इमारतीचे लोकार्पणही कधी झाले याची साधी कल्पनाही परिसरातील नागरिकांना झाली नाही. पशु चिकित्सालयात सेवा देणार्या अधिकारी व कर्मचारी यांनी मुख्यालयी राहावे म्हणून येथे निवासस्थानी बांधण्यात आले असले तरी ते वास्तव्य करीत नसल्याने वर्षभरापासून महावितरणचे विद्युत खांब लावणार्या खाजगी कंत्राटदार व त्यांचे कामगारांनी येथे ठिय्या मांडला आहे. त्यांच्या वास्तव्याने परिसरातील पशुपालकांना पशुचिकित्सेत अडथळा निर्माण होत आहे. शिवाय कोट्यवधींच्या इमारतीचा गैरवापर होऊन होत असून चिकित्सालय परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. कुणाच्या संमती हे लोक येथे वास्तव्य करीत आहेत? असा प्रश्न जनतेला पडला आहे.
शासकीय इमारती खाजगी इसमांना वास्तव्यासाठी दिल्या जात नाही, मात्र मुल्ला येथील पशु चिकीचलयाच्या इमारतीत परप्रांतीय विद्युत खांब लावणारे ठेकेदार वर्षभरापासून निवासी आहेत. त्यांना संबंधित अधिकार्यांनी वास्तव्याची परवानगी दिली हे न समजणारे कोडे आहे. त्यांना कुणाचे पाठबळ असावे, अधिकारी त्यांना तेथून हाकलून का लावत नाही? असा प्रश्न परिसरातील नागरिकांनी उपस्थित केला आहे.
मुल्ला येथील पशु चिकीत्सालयात विद्युत ठेकेदार राहत असल्याची माहिती मिळाली आहे. त्यांना इमारत सोडण्यासंदर्भात सांगीतले आहे. ते इमारत सोडत नसतील तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल.
संजीवनी वाघमारे
पशुधन सहायक आयुक्त, देवरी