मुंबई,
bjp-campaigners-announced : भाजपने आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी स्टार प्रचारकांची नावं जाहीर केली आहेत. यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राष्ट्रीय सहसंघटन मंत्री शिव प्रकाश, राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, केंद्रीय मंत्री पियुष गोयल, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, मंत्री बावनकुळे आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवारांचा समावेश आहे.

राज्यामध्ये आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पृष्ठभूमीवर सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. त्यामध्ये आता प्रत्यक्ष निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर भाजपच प्रत्येक ठिकाणी आघाडी घेताना दिसत आहे. स्थानिक पातळीवरील गणितं सांभाळून जिथे युती होते तिथे युतीच्या आणि जिथे युती होत नाही तेथे मैत्रिपूर्ण लढतीसाठी भाजपा सज्ज झालेलं आहे. दरम्यान राज्यामध्ये काही अपवाद वगळता बहुतांश ठिकाणी मात्र सर्वच पक्ष स्वबळावर निवडणुका लढणार असल्याचं चित्र सध्यातरी दिसत आहे. परिस्थिती काहीही समोर आली तरी, ताकदीनं लढण्यासाठी भाजपाने कंबर कसली असून, त्यासाठी आता आपल्या उमेदवारांच्या प्रचारार्थ भाजपा नेत्यांना स्टार प्रचारक म्हणून उतरविले आहे.
भाजपाने जारी केले या स्टार प्रचारकांमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राष्ट्रीय सहसंघटनमंत्री शिव प्रकाश, चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे, अशोक चव्हाण, पीयूष गोयल, नारायण राणे, सुधीर मुनगंटीवार, मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील, रावसाहेब दानवे पाटील, मंत्री अॅड. आशिष शेलार, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, रक्षा खडसे, मंत्री पंकजा मुंडे, गिरीश महाजन, गणेश नाईक, जयकुमार रावल, छ.शिवेंद्रराजे भोसले, नितेश राणे, जयकुमार गोरे, मेघना बोर्डीकर, अमर साबळे, अतुल सावे, अशोक उईके, चित्रा वाघ, प्रविण दरेकर, भागवत कराड, गोपीचंद पडळकर, डॉ.संजय कुटे, अमित साटम, धनंजय महाडिक, अॅड. माधवी नाईक, रणधीर सावरकर, अशोक नेते, मंगेश चव्हाण, प्रसाद लाड, इद्रिस मुलतानी अशा 40 नेत्यांचा समावेश आहे.