अनिल कांबळे
नागपूर,
knife attack प्रेमास नकार देणाèया तरुणीवर चाकूने हल्ला करुन जीवे मारण्याचा प्रयत्न करणाèया प्रेमवेड्या तरुणाला नागपूर जिल्हा व सत्र न्यायालयाने चार वर्षांची सक्तमजुरी आणि 50 हजार रुपयांचा दंड ठाेठावला आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश नितीन जाधव यांनी हा निर्णय दिला. आराेपी प्रशांत भरसागडे असे शिक्षा झालेल्या तरुणाचे नाव आहे.
सन 2020 मध्ये जखमी माेना (बदललेले नाव)ही डाॅ. गिरीपुंजे यांच्या दवाखान्यात नर्सिंग स्टाफ म्हणून कार्यरत हाेती. आराेपी प्रशांत भरसागडे याने तिच्याशी ओळख वाढवली. तिच्याशी मैत्री केल्यानंतर तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिने त्याच्या प्रेमाला थेट नकार देत त्याचा माेबाईल क्रमांक ब्लाॅक केला. त्यानंतर प्रशांतने व्हाॅट्सअॅपवर एका मुलीची डीपी ठेवून स्वतःचे नाव ‘मुस्कान’ असल्याचे भासवले आणि माेनाशी पुन्हा मैत्री केली. तिला भेटायला ये, अशी विनंती केली. तिला एचबी टाउन येथे बाेलावले. मात्र प्रत्यक्ष भेटीच्या वेळी मुस्कान ही व्यक्ती प्रत्यक्षात प्रशांत असल्याचे उघड झाले. माेनाने त्याच्याशी प्रेमसंबंध ठेवण्यास नकार दिला.
त्यामुळे चिडलेल्याknife attack आराेपीने वारंवार फोन करून लग्नाचा आग्रह धरला तसेच हाॅस्पिटलमध्ये येऊन तिला धमकावणे सुरू केले. 8 डिसेंबर 2020 राेजी माेना ही डाॅ. गिरीपुंजे हाॅस्पिटलमध्ये शुगर टेस्टचा रिपाेर्ट घेण्यात व्यस्त असताना प्रशांत तेथे पाेहाेचला. त्याने पुन्हा लग्नाचा आग्रह धरला आणि नकार मिळताच मागून पाठीत चाकूने वार केला. माेना वळल्यावर त्याने पाेटावर आणि डाेक्यावरही वार केले, ज्यामुळे ती गंभीर जखमी झाली. घटनेनंतर नंदनवन पाेलिसांनी कलम 307 आणि आर्म्स अॅक्ट अंतर्गत गुन्हा नाेंदविला. रामझुल्यावरील अपघात प्रकरणात संशयास्पद वागणूक आणि वादग्रस्त ठरलेले पाेलिस उपनिरीक्षक परशुराम भवाळ यांनी आराेपपत्र दाखल केले. सरकार पक्षार्ते सरकारी वकील अभय जिकार यांनी खटला कुशलतेने चालवला. सात साक्षीदारांची तपासणी झाली. जखमी माेना यांची साक्ष व वैद्यकीय पुरावे विश्वासार्ह मानण्यात आले. आराेपीच्या बचावाला काेणताही आधार न मिळाल्याने न्यायालयाने प्रशांत भरसागडे यास दाेषी ठरवून चार वर्षांची सक्तमजुरी व 50 हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली.