नायब तहसीलदार तवारी पदावनत

खोटया कागदपत्रांच्या आधारे मिळवली होती पदोन्नती

    दिनांक :12-Nov-2025
Total Views |
गोंदिया, 
naib-tehsildar-tawari-demoted येथील तहसील कार्यालयात कार्यरत नायब तहसीलदार प्रकाश बसंतकुमार तिवारी यांनी खोट्या माहिती व कागदपत्रांच्या आधारे मिळवलेली पदोन्नती रद्द करण्यात आली आहे. त्यांना पदावनत करून तलाठी पदावर कायम राहण्याबाबतचे आदेश राज्यपाल यांच्या आदेशाने शासनाच्या महसूल विभागाचे कार्यासन अधिकारी श्रीकांत मोहिते यांनी काढले आहे.
 
 
naib-tehsildar-tawari-demoted
 
तिवारी यांनी खेटी माहिती व कागदपत्रांच्या आधारे पदोन्नती घेतल्याची बाब समोर येताच येथील अप्पर तहसील कार्यालयातील तलाठी जी. बी. हटवार यांनी तक्रार केली होती. naib-tehsildar-tawari-demoted तक्ररीच्या अनुषंगाने चौकशी करण्यात आली. चौकशीत तिवारी यांनी महसूल अर्हता परीक्षा उत्तीर्ण झाली नसल्याची बाब व खोटया कागदपत्रांच्या आधारे पदोन्नती मिळवली असल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्या महसूल अर्हता परीक्षेबाबत सेवापुस्तकात चूकीची नोंद घेण्यात आल्यामुळे त्यांना मंडळ अधिकारी व नायब तहसीलदार पदावर देण्यात आलेली पदोन्नती तात्काळ रद्य करून तिवारी यांना तलाठी संवर्गात पदावनत करण्यात आले आहे. त्यांनी पदोन्नतीसाठीची महसूल अर्हता परीक्षा उत्तीर्ण होण्याची पात्रता पूर्ण केली नसून महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, नागपूर यांनी प्रकाश तिवारी विरूध्द महाराष्ट्र शासन व ईतर प्रकरणात न्यायालयाने 10 ऑक्टोबर रोजीच्या शासन आदेशास पुढील तारखेपर्यत स्थगीती दिली आहे.

तिवारींनी पदोन्नतीकरिताची महसूल अर्हता परीक्षा उत्तीर्ण केली नसतानाही सेवापुस्तकात चुकीची नोंद घेण्यात आली. यामुळे त्यांना मंडळ अधिकारी व नायब तहसीलदार पदावर देण्यात आलेली पदोन्नती रद्द करुन तलाठी संवर्गात पदावनत करण्यात आले. आता तिवारींवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेशात म्हटले आहे. तसेच सेवापुस्तक हाताळणारे व नोंद करणार्‍या संबंधित जबाबदार अधिकारी, कर्मचारी आणि शासन ज्ञापनाच्या वैधतेबाबत तपासणी न करता कार्यवाही करणारे तत्कालीन तलाठी, आस्थापना लिपिक हर्षल लांजेवार यांचेविरुध्द देखील शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी. असेही आदेशात नमूद आहे.