तभा वृत्तसेवा
उमरखेड,
nitin gadakari विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसन वानखेडे यांनी नागपूर येथे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन मतदारसंघातील महत्त्वाच्या रस्ते विकास कामांबाबत सविस्तर चर्चा केली. या भेटीत आमदार वानखेडे यांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 361 (नागपूर-तुळजापूर) वरील उमरखेड बायपासच्या सुरुवातीस आणि शेवटी तसेच महागाव बायपासच्या (उमरखेड रस्त्याच्या बाजूला) सुरुवातीस उड्डाणपूल मंजूर करण्यात यावेत, अशी मागणी केली.
या विनंतीवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सकारात्मक प्रतिसाद देत दोन्ही उड्डाणपूल लवकरच मंजूर करण्यात येतील, असे आश्वासन दिले.nitin gadakari या भेटीमुळे उमरखेड आणि महागाव परिसरातील वाहतुकीचा ताण कमी होण्यासह शहरातील वाढती गर्दी आणि अपघाताचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे. नागरिकांकडून या उपक्रमाचे स्वागत करण्यात येत आहे.