संत ज्ञानेश्वर उद्यान कृती समितीची स्थापना

    दिनांक :12-Nov-2025
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर,
sant-dnyaneshwar-udyan-committee दत्तात्रयनगरातील संत ज्ञानेश्वर उद्यान परिसरातील नागरिकांमध्ये आराेग्यप्रती सजगता निर्माण व्हावी तसेच उद्यानातील समस्या शासनदरबारी मांडण्यासाठी एक क्रियाशील समिती असावी, या सकारात्मक उद्देशाने संत ज्ञानेश्वर उद्यान कृती समितीची स्थापना करण्यात आली. या समितीच्या अध्यक्षपदी डाॅ. बबनराव गांजरे तर सचिवपदी दिनेश खुरसडे यांची निवड करण्यात आली.
 
 
sant-dnyaneshwar-udyan-committee
 
संत ज्ञानेश्वर उद्यान कृती समितीची स्थापना करण्यासाठी सार्वत्रिक सभा पार पडली. त्यात सर्वसंमतीने कृती समिती कार्यकारणी संचालक मंडळ गठित करण्यात आले. उद्यान कृती समिती स्थापन करण्यामागील मुख्य उदिष्ट उद्यानमध्ये येणाèया शेकडाे सामान्य नागरिकांच्या उद्यानातील मूलभूत समस्या, जसे उद्यानातील नादुरुस्त ट्रॅक उंच करणे, नव्याने ग्रीन जिम लावणे, लहान मुलांची खेळणी बसविणे, सुलभ शाैचालयाची नियमित स्वच्छता व देखभाल दुरुस्ती नियमित हाेणे, ज्येष्ठ नागरिकांसाठी उद्यानात बसण्यासाठी बेंचची मागणी, या व्यतिरिक्त सामाजिक, आराेग्यविषयक, पर्यावरणपूरक झाडे आणि उद्यानात सांस्कृतिक उपक्रम राबविणे, यासाठी नियाेजित संत ज्ञानेश्वर उद्यान कृती समितीची स्थापना करण्यात आली असल्याचे नियाेजित उद्यान कृती समितीचे नवनिर्वाचित अध्यक्ष डाॅ. बबनराव गांजरे यांनी सांगितले. sant-dnyaneshwar-udyan-committee या कृती समितीमध्ये उद्यानात नियमित असलेल्या बहुतांश सर्व ग्रुपच्या मुख्य प्रतिनिधींचा समावेश करण्यात आला. नियाेजित कृती समिती स्थापन करण्यासाठी माेलाचे मार्गदर्शन पांडुरंगजी वाकडे पाटील यांचे लाभले.
उद्यान कृती समितीत यांचा आहे समावेश
बबनराव गांजरे (अध्यक्ष), मनाेहरराव महाकाळकर(उपाध्यक्ष),महेंद्र क्षिरसागर(उपाध्यक्ष), दिनेश खुरसडे (सचिव), नागेशजी जैन, तानाजी कडवे, लक्ष्मण बालपांडे, विनाेद लुटे, निशिकांत मामिडवार, देवाजी ठाकरे, डाॅ. जयवंत जगताप, रमेश काकडे, भागवतराव वऱ्हाडे, अ‍ॅड.के. अनिल दामोदर, महादेवराव ताेंडरे, माराेतराव भाेयर आणि भरतजी ठाकरे यांचा समावेश आहे. प्रमुख मार्गदर्शक म्हणून पांडुरंगजी वाकडे (पाटील) यांचा समावेश आहे.