पाकिस्तान बेकायदेशीर शस्त्रास्त्र तस्करीचे केंद्र

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताने सुनावले, सीमापार दहशतवाद्याला पाठबळ

    दिनांक :12-Nov-2025
Total Views |
न्यू यॉर्क, 
UN Security Council : अनेक दशकांपासून भारत सीमापार दहशतवाद आणि बेकायदेशीर शस्त्रास्त्र तस्करीचा सामना करीत आहे आणि पाकिस्तान शस्त्रास्त्रतस्करीचे केंद्र बनले आहे. सीमेवरून ड्रोनद्वारे शस्त्रे पाठवली जात असून, भारत सीमापार दहशतवाद आणि बेकायदेशीर शस्त्रास्त्र तस्करीचा बळी ठरत आहे. सीमापार दहशतवाद्यांना पाठिंबा देणाèया पाकिस्तानविरोधात जगाने एकत्र यावे असे खडेबोल भारताचे संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेतील स्थायी प्रतिनिधी पार्वतानेनी हरीश यांनी सुनावले.
 

pak 
 
 
 
शस्त्रास्त्रांची बेकायदेशीर विक्रीवर बंदी आणण्यासाठी उपाययोजना करण्यासंदर्भात सुरक्षा परिषदेत चर्चा आयोजित करण्यात आली, यावेळी भारताची बाजू मांडताना पार्वतानेनी हरीश म्हणाले, सीमेवरून ड्रोनद्वारे भारतात शस्त्रे पाठवली जात असून, यामागे पाकिस्तानचा सहभाग आहे. शस्त्रांच्या हालचाली आणि वापराला प्रोत्साहन देणाèयांविरुद्ध शून्यसहिष्णुता धोरण स्वीकारले पाहिजे. शस्त्रास्त्रे आणि दारूगोळ्याच्या बेकायदेशीर तस्करीमागे दहशतवादी संघटना आहे. राजधानी दिल्लीत झालेल्या स्फोटामागे सीमेपलीकडून होणारी शस्त्र तस्करी जबाबदार आहे. दहशतवादी गटांना आर्थिक रसद पुरवली जात असल्यानेच त्यांच्याकडे अत्याधुनिक शस्त्रे आहे. दहशतवाद्यांना आणि सशस्त्र गटांना शस्त्रे पुरवणाèयांविरुद्ध कठोर कारवाई व्हायला हवी.
 
 
नियमांची काटेकोर अंमलबजावणी करावी
 
 
हरीश म्हणाले की, सुरक्षा परिषदेने कोणत्याही प्रकारच्या दहशतवादाबद्दल किंवा त्याला पाठिंबा देणाèयांबद्दल सहिष्णुता दाखवू नये. संघर्ष सुरू असलेल्या भागात शस्त्रांचा पुरवठा थांबवण्यासाठी शस्त्रास्त्र बंदी हा एक प्रभावी मार्ग आहे, परंतु तो निष्पक्षपणे आणि काटेकोरपणे अंमलात आणला पाहिजे. शस्त्रांची तस्करी केवळ सुरक्षेवरच नव्हे तर विकास आणि मानवतावादी पैलूंवरही परिणाम करते.