नवी दिल्ली,
patient fell onto road with a stretcher महामार्गावरून धावणाऱ्या रुग्णवाहिकेचा एक धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. जीव वाचवण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या या वाहनाने एका रुग्णाचे प्राण धोक्यात घातले, हे दृश्य पाहून नेटिझन्स स्तब्ध झाले आहेत. रुग्णवाहिकेच्या निष्काळजीपणामुळे एका रुग्णाचा स्ट्रेचरसह महामार्गाच्या मध्यभागी पडण्याचा थरारक प्रसंग घडला आणि चालकाला या घटनेची कल्पनाही नव्हती.
व्हिडिओमध्ये दिसते की एक रुग्णवाहिका अतिवेगाने महामार्गावरून जात आहे. तिच्यासोबत इतर अनेक वाहनेही चाललेली आहेत. काही क्षणातच रुग्णवाहिकेचा मागचा दरवाजा अचानक उघडतो आणि स्ट्रेचरवर ठेवलेला रुग्ण थेट रस्त्यावर कोसळतो. अधिक धक्कादायक म्हणजे, चालकाला या घटनेची काहीच खबर लागत नाही आणि तो रुग्णवाहिका पुढे चालवत राहतो. ही घटना मागून येणाऱ्या कारमधील प्रवाशांनी त्यांच्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केली आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर के
रुग्णवाहिकेतून खाली पडलेला रुग्ण स्ट्रेचरवरच महामार्गाच्या मध्यभागी पडलेला दिसतो. सुदैवाने त्या वेळी मागून कोणतेही वाहन आले नाही, अन्यथा मोठा अपघात घडू शकला असता. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर इंटरनेटवर संतापाची लाट उसळली आहे. अनेकांनी रुग्णवाहिका चालक आणि रुग्णसेवा यंत्रणेच्या निष्काळजीपणावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.