सरकारी कर्मचारी संघटनेच्या वतीने संविधान चौकात आंदोलन

    दिनांक :12-Nov-2025
Total Views |
नागपूर,
protest at samvidhan chowk राज्य सरकारच्या उदासीन धोरणाचा निषेध करण्यासाठी जिल्ह्यामधील सर्व सरकारी कार्यालय, शाळेसमोर कर्मचारी व शिक्षकांनी निदर्शने केली.राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या वतीने संविधान चौकात आंदोलन करण्यात आले. सरकारी व निमसरकारी शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना समन्वय समितीच्या वतीने विविध मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यात आले.
 

sanvidhan chowk 
 
 
नागपूर जिल्हातील सर्व कार्यालयासमोर दुपारी भोजन सुट्टीत एक तास धरणे देण्यात आले. अशोक दगडे यांच्या नेतृत्वात आंदोलनात ज्ञानेश्वर महल्ले, गोपीचंद कातुरे,अशोक गव्हाणकर,बुधाजी सुरकर आदींनी सहभाग नोंदविला.protest at samvidhan chowk राज्य सरकारी कर्मचार्‍यांचे प्रश्न सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन अधिसूचना काढणे, कंत्राट कर्मचा-यास करणे,रिक्त जागा भरणे आदींकडे लक्ष वेधण्यात आले. आंदोलनात कर्मचारी , शिक्षक व सेवानिवृत्त कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलनात नाना कडबे,प्रल्हाद शेंडे,यशवंत कडू,सुनिल व्यवहारे, प्रकाश मामुलकर आदी सहभागी झाले होते.