रेल्वेस्थानकावर हाय अलर्ट कायम

-लोहमार्ग पोलिस कर्मचारी चोवीस तास बंदोबस्तात -रेल्वे स्थानकावर बॉम्ब शोधक तपासणी -प्रत्येक रेल्वे गाड्यांची तपासणी -संशयास्पद हालचालींवर लक्ष

    दिनांक :12-Nov-2025
Total Views |
नागपूर,
railway-station-high-alert : दिल्लीतील कार स्फोटाच्या घटनेनंतर मध्यवर्ती रेल्वेस्थानकावर कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. दिल्लीहून येणार्‍या सर्व रेल्वे गाड्यांची कसून तपासणी केल्या जात आहे. नागपूरसह अजनी, इतवारी रेल्वेस्थानकावर हाय अलर्ट असल्याने कडक सुरक्षा व्यवस्था कायम आहे. लोहमार्ग पोलिसांचे एकूण ४५ कर्मचारी तास बंदोबस्तात तैनात करण्यात आले आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने ३० अतिरिक्त कर्मचारी मुख्यालयातून मागविण्यात आले आहेत. यासह दोन बॉम्बशोधक व नाशक पथके (बीडीडीएस) २४ तास कार्यरत ठेवण्यात आले आहे.

11-nov-17 
 
रेल्वे गाड्यांवर सुरक्षा यंत्रणेचे विशेष लक्ष
 
 
मुख्यत: सोमवारी राजधानी दिल्लीत दहशतवादी हल्ल्यानंतर सर्व स्थानकावर तपासणी केल्या जात आहे. ’हाय अलर्ट’ घोषित नागपूर रेल्वेस्थानकावर गत दोन दिवसांपासून लोहमार्ग पोलीस आणि रेल्वे सुरक्षा बलाकडून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.दिल्ली, मुंबईसह देशातील प्रमुख शहरातून नागपूरला येणार्‍या गाड्यांवर सुरक्षा यंत्रणेचे विशेष लक्ष आहे. मुख्य रेल्वेस्थानकासह अजनी आणि सुभाषचंद्र बोस इतवारी रेल्वेस्थानकांवरही कडक सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली आहे.
 
सीसीटीव्हीवर सूक्ष्म नजर
 
 
मध्य रेल्वेच्या क्षेत्रात येणार्‍या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांवर विशेष सुरक्षा लावण्यात आली असून तपासणी मोहीम कडक करण्यात आली आहे. सीसीटीव्हीवर सूक्ष्म नजर रोखण्यात आली आहे. मध्यवर्ती रेल्वेस्थानक परिसरात येणार्‍या प्रत्येक वाहनाची तपासणी केल्या जात आहे. प्रवाशांच्या सामनाची मेटल डिटेक्टरने तपासणी झाल्यानंतरच आत सोडल्या जात आहे. संशयास्पद सामनाची पुन्हा तपासणी केल्या जात आहे. याशिवाय स्कॅनिंग मशीनद्वारे केल्या जात असल्याची माहिती पोलिस निरीक्षक गौरव गावंडे यांनी दिली.
 
प्लॅटफार्मवरील प्रवाशांच्या सामानांची तपासणी
 
मध्यवर्ती रेल्वेस्थानकावर येणार्‍या सर्व प्रवाशांची तपासणी केल्या जात आहे. स्थानकावरील प्रतीक्षालय व प्लॅटफार्मवरील प्रवाशांच्या सामानांची तपासणी केल्या जात आहे. लोहमार्ग पोलीसांकडून संशयास्पद हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. आरपीएफने कर्मचार्‍यांची ड्युटी ८ तासांवरून १२ तासांपर्यंत आली आहे.
 
डॉग स्क्वॉड आणि बीडीडीएस पथक तैनात
 
 
नागपूरच्या इतवारी रेल्वे स्थानकापासून तो डोंगरगड, रायपूर पर्यंत येणार्‍या सर्व रेल्वे स्थानकावर सुरक्षा वाढविण्यात आली आहे. अनेक रेल्वे गाड्यांची कसून तपासणी केली जात असल्याची माहिती दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे आरपीएफचे आयुक्त दीपचंद्र आर्य यांनी दिली आहे. दिल्लीहून येणार्‍या गाड्यांची खास तपासणी जात आहे. मध्य रेल्वेच्या क्षेत्रात येणार्‍या महत्त्वाच्या सर्व रेल्वे स्थानकांवर विशेष सुरक्षा लावण्यात आली असून तपासणी मोहीम कडक करण्यात आली आहे. डॉग स्क्वॉड आणि बीडीडीएस पथक तैनात असून संशयास्पद व्यक्तींवर लक्ष ठेवण्यात येत असल्याचे रेल्वे पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे यांनी सांगितले. रेल्वे स्थानकावर येणार्‍या गाड्यांची तपासणी सुरू असून संशयास्पद लक्ष असून आरपीएफने कर्मचार्‍यांची ड्युटी ८ ऐवजी १२ तासांची केल्याचे पोलिस निरीक्षक सत्येंद्र यांनी सांगितले.