तरुणाईसाठी ‘संपर्क मित्र’चा प्रेरणादायी उपक्रम!

    दिनांक :12-Nov-2025
Total Views |
नागपूर,
Ramakrishna Wagh College संवाद, समाज आणि माध्यम यांची सांगड घालणारा ‘संपर्क मित्र तरुण भारत’ हा अनोखा उपक्रम रामकृष्ण वाघ कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्समध्ये उत्साहात पार पडला. छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेद्वारा संचालित या महाविद्यालयात सामाजिक शास्त्र आणि भाषा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलहोते.व्यासपीठावर प्रभारी प्राचार्य प्रा. पंकज झगडे, प्रमुख पाहुण्या तरुण भारतच्या संपर्क मित्र प्रकल्प प्रमुख गौरी सरनाईक तसेच विविध शाखा विभाग प्रमुख उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व दीपप्रज्वलनाने झाली. स्वागतगीतांच्या स्वरांनी वातावरण भारावून गेले.
 

gauri 
 
प्रा. सायली लाखे पिदळी यांनी प्रास्ताविक केले. गौरी सरनाईक यांनी आपल्या प्रेरणादायी भाषणात विद्यार्थ्यांना माध्यमांच्या जगाशी जोडत सामाजिक जाणीव जागवली.  Ramakrishna Wagh College “तरुणाईने समाजाशी संवाद साधायला शिकले पाहिजे कारण संपर्क म्हणजेच शक्ती,” असे त्यांनी सांगितले.सूत्रसंचालन प्रा. दीप्ती धकीते यांनी केले, तर आभार प्रा. शुभांगी वाघ यांनी मानले.कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली.संस्थापक सचिव डॉ. मारोती वाघ आणि संचालिका लता वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली झालेला हा कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे खऱ्या अर्थाने यशस्वी ठरला.
सौजन्य :प्रा. सायली लाखे /पिदळी,संपर्क मित्र