नवी दिल्ली
Sanatan Ekta Yatra दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ सोमवारी झालेल्या भीषण स्फोटानंतर या घटनेची चौकशी जलदगतीने सुरू आहे. लाल किल्ला मेट्रो स्थानकाच्या गेट क्रमांक १ जवळ धीम्या वेगाने चालणाऱ्या कारमध्ये स्फोट झाला होता. पोलिसांनी या प्रकरणात काही संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. गृह मंत्रालयाने या घटनेची चौकशी राष्ट्रीय तपास संस्था (NIA)कडे सोपवली आहे. दरम्यान, या स्फोटानंतर बागेश्वर धामचे पीठाधीश धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या ‘सनातन एकता यात्रा’ची सुरक्षा मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली आहे.
पलवल जिल्ह्याचे Sanatan Ekta Yatra पोलिस अधीक्षक वरुण सिंगला यांनी दिलेल्या माहितीनुसार, यात्रेच्या सुरक्षा तुकडीत दोन अतिरिक्त कंपन्या तसेच जैमर वाहनांचा समावेश करण्यात आला आहे. यापूर्वी यात्रेच्या सुरक्षेसाठी तीन पोलिस कंपन्या तैनात होत्या. आता या सुरक्षादलात आणखी २०० जवानांची भर घालण्यात आली आहे. त्याचबरोबर बॉम्ब निरोधक पथक आणि विशेष तपासणी पथकही कार्यरत आहे. जिल्ह्यात सध्या मोठ्या प्रमाणावर सर्च ऑपरेशन आणि चौकशी मोहीम सुरू आहे.
सध्या बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्री Sanatan Ekta Yatra यांची ‘सनातन एकता यात्रा’ हरियाणातील पलवलमार्गे पुढे जात आहे. सात नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता छत्तरपूर येथील आद्य कात्यायनी मंदिरातून या यात्रेची सुरुवात झाली होती. ही यात्रा उत्तर प्रदेशातील वृंदावन येथील श्री बांके बिहारी मंदिरात १६ नोव्हेंबर रोजी संपन्न होणार आहे. या यात्रेत ५० हजारांहून अधिक लोक सहभागी होतील, अशी अपेक्षा आहे. प्रसिद्ध कुस्तीपटू द ग्रेट खली, क्रिकेटपटू उमेश यादव आणि शिखर धवन यांनीही या यात्रेत सहभाग घेतला आहे.दरम्यान, पलवल महामार्गावर पोलिसांनी काही युवकांना ट्रॅक्टर आणि बाईकवर स्टंट करताना रोखले. याचदरम्यान अतोह मोडजवळ घडलेल्या अपघातात यात्रेत सहभागी असलेल्या ३५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. त्याची ओळख ऋषिकेशमधील सुभाष अशी झाली आहे.लाल किल्ला स्फोट प्रकरणानंतर सुरक्षा यंत्रणा उच्च सतर्कतेवर असून, यात्रेच्या संपूर्ण मार्गावर कडक सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्या आहेत.