जिल्ह्यात ६ खरेदी केंद्रासह बाजार समितीमार्फत सोयाबीन खरेदी

    दिनांक :12-Nov-2025
Total Views |
वर्धा, 
Soybean purchase through market committee राज्य शासनाने सोयाबीनची हमीभावाने खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. सोयाबीनचा हमीभाव ५ हजार ३२८ रुपये आहे. जिल्ह्यातील ६ खरेदी विक्री केंद्रांवर व ७ कृषी उत्पन्न बाजार समिती मार्फत १५ नोव्हेंबरपासून सोयाबीनची खरेदी केली जाणार आहे. यासाठी नोंदणी प्रक्रिया सुरू असून शेतकर्‍यांनी संबंधित खरेदी केंद्रावर सोयाबीन खरेदीसाठी आणावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
 
 

Soybean purchase wardha 
 
सोयाबीन उत्पादक शेतकर्‍यांनी त्यांचा सातबारा उतारा, आधारकार्ड व बँक पासबुकच्या प्रतीसह नोंदणी करीता तालुयाच्या खरेदी विक्री किंवा कृषि उत्पन्न बाजार समितीशी संपर्क साधावा. भारतीय कपास निगम मार्फत हमी भावाने मोठा धागा असलेला कापूस ८ हजार १०० रुपये व लहान धागा असलेला कापूस ७ हजार ८५० रुपये दराने खरेदी करण्यात येत आहे. यासाठी वर्धामध्ये वायगाव, सेलू, देवळी तालुयात देवळी, पुलगाव, हिंगणघाट तालुयात हिंगणघाट, वडनेर, समुद्रपूर, आर्वी तालुयात आर्वी, रोहणा, खरांगणा तसेच कारंजा येथील विविध १३ केंद्र व ५९ जिनिंगमध्ये कापूस खरेदी करण्यात येत आहे. शेतकर्‍यांनी कपास किसान या अ‍ॅपवर नोंदणी करावी किंवा यासंबंधित कृषी उत्पन्न बाजार समितीशी संपर्क साधून नोंदणी करुन घ्यावी, असे सहकारी संस्थेच्या जिल्हा उपनिबंधकांनी कळविले आहे.