जयताळा परिसरात गुरांचा सुळसुळाट !

    दिनांक :12-Nov-2025
Total Views |
नागपूर,
Stray cattle problem जयताळा परिसरातील बसस्थानक, मुख्य रस्ते आणि गल्लीबोळात गुराढोरांचा सुळसुळाट वाढत चालला आहे. या बेवारस जनावरांमुळे पादचारी, दुचाकीस्वार आणि वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अनेकदा अपघातही होत आहेत.

gur 
 
स्थानिक नागरिकांनी महानगरपालिकेकडे वारंवार तक्रारी करूनही अद्याप ठोस उपाययोजना झालेली नाही. शाळकरी विद्यार्थी आणि वृद्ध नागरिकांना रोजच्या प्रवासात या जनावरांचा धोका जाणवतो.Stray cattle problem नागरिकांची मागणी आहे की, महानगरपालिकेने तातडीने या बेवारस गुरांचा बंदोबस्त करावा, जेणेकरून अपघातांना आळा बसेल आणि परिसरातील नागरिकांना दिलासा मिळेल.
 
सौजन्य:शुभांगी अंधारे,संपर्क मित्र