यूपीएससी मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर; २,७३६ उमेदवारांना मुलाखतीची संधी

    दिनांक :12-Nov-2025
Total Views |
नवी दिल्ली,
UPSC Mains Exam Result Declared केंद्रीय लोकसेवा आयोगाने नागरी सेवा मुख्य परीक्षा २०२५ चा निकाल जाहीर केला आहे. देशभरातील हजारो उमेदवार या निकालाची आतुरतेने वाट पाहत होते. आयोगाने प्रसिद्ध केलेल्या निकालानुसार, एकूण २,७३६ उमेदवार पुढील टप्प्यासाठी म्हणजेच मुलाखतीसाठी पात्र ठरले आहेत. या उमेदवारांना भारतीय प्रशासकीय सेवा, भारतीय परराष्ट्र सेवा, भारतीय पोलिस सेवा आणि इतर केंद्रीय सेवांमध्ये सामील होण्याची संधी मिळणार आहे.

UPSC Mains Result released
 
 
यूपीएससी मुख्य परीक्षा यावर्षी २२ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट २०२५ दरम्यान दोन शिफ्टमध्ये घेण्यात आली होती. परीक्षेचा निकाल आयोगाच्या अधिकृत वेबसाइटवर https://upsc.gov.in/ उपलब्ध करून देण्यात आला आहे. उमेदवारांनी या वेबसाइटवर भेट देऊन Civil Services (Main) Examination 2025 Result” या लिंकवर क्लिक करावे. त्यानंतर आपला नोंदणी क्रमांक प्रविष्ट केल्यानंतर निकाल PDF स्वरूपात पाहता येतो तसेच डाउनलोडही करता येतो.
 
 
निकालानंतर आता पात्र उमेदवारांना यूपीएससीमुलाखतीसाठी बोलावले जाणार आहे. या मुलाखती दिल्लीतील यूपीएससी मुख्यालयात आयोजित केल्या जातील. मुलाखतीसंबंधी वेळापत्रक आणि मार्गदर्शक सूचना आयोग लवकरच जाहीर करणार आहे. संघ लोकसेवा आयोगाची नागरी सेवा परीक्षा ही देशातील सर्वात कठीण आणि प्रतिष्ठेची परीक्षा मानली जाते. ही परीक्षा तीन टप्प्यांत पार पडते, पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत. पूर्व परीक्षेत यशस्वी झालेल्या उमेदवारांनाच मुख्य परीक्षेत बसण्याची संधी मिळते, तर मुख्य परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांची मुलाखत घेतल्यानंतर अंतिम निकाल घोषित केला जातो. अंतिम निकालानंतर पात्र ठरलेले उमेदवार देशाच्या विविध सेवांमध्ये अधिकारी म्हणून रुजू होतात. यूयूपीएससीकडून लवकरच मुलाखतींच्या तारखा आणि आवश्यक कागदपत्रांबाबतची माहिती अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यामुळे उमेदवारांना नियमितपणे आयोगाच्या पोर्टलला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.