तभा वृत्तसेवा
वणी,
devvrat-rekhe : वेदोऽखिलो धर्ममूलम् ! वेद हे अखिल धर्माचे मूळ आहेत. केवळ धर्माचेच नव्हे तर संपूर्ण जीवनाचे आधारस्तंभ आहेत. वेद विद्येचे जतन हा मानवी इतिहासातील एक अलौकिक असा ठेवा आहे. केवळ पाठांतराच्या आधारे हजारो वर्ष एक स्वर देखील न बदलता अखिल वेदविद्येचे संगोपन आणि प्रसारण करण्यासाठी हजारो ज्ञानवंतांनी आपली जीवन समर्पित केले आहे. याच श्रुंखलेत अविमुक्त क्षेत्र काशीमध्ये परमपूज्य द्राविड शास्त्रींच्या सामवेद विद्यालयात सुरू असलेले शुक्ल यजुर्वेदाच्या माध्यंदिन शाखेचे दंडक्रम पारायण.
वेदमंत्रांच्या सुस्पष्ट आणि अपरिवर्तित जोपासनेसाठी ज्या विविध पद्धतींमध्ये त्यांचे पठण केल्या जाते. त्याला अष्ट विकृती असे म्हणतात. यापैकी ही पद्धती अत्यंत कष्टसाध्य असून या स्वरूपातील शुक्लयुर्वेदाच्या दंडक्रम पारायणाचा हा योग तब्बल 200 वर्षानंतर साकार होत आहे. यातच त्याचे अतुलनीयत्व लक्षात येते. हे कार्य साकार करणारे वेदमूर्ती देवव्रत महेश रेखे हे श्री अहिल्यानगर स्थित 19 वर्षांचे नवयुवक आहेत.
पद्मश्री सन्मानप्राप्त गणेश्वरशास्त्री द्राविड व त्यांचे ज्येष्ठ बंधू विश्वेश्वर शास्त्री यांच्या आशीर्वादाने सामवेद विद्यालयात होत असलेल्या पारायणात अमरावती येथील वेदमूर्ती देवेंद्र रामचंद्र गढीकर परीक्षणाचे दायित्व सांभाळत आहेत.
अहिल्यानगर येथे महेश रेखे व कै. मधुरा महेश रेखे यांनी स्थापन केलेल्या श्रुती स्मृती ज्ञानमंदिर वेदपाठशाळेच्या द्वादशाब्दी निमित्ताने हे पारायण आयोजित होत आहे. पारायण कर्ते, पारायण परीक्षक आणि पारायण आयोजक अशा सर्व महाराष्ट्रीयन लोकांच्या माध्यमातून काशीक्षेत्रात होत असलेला संपूर्ण वेदाचे मुखोद्गत स्वरूपातील सादरीकरणाचा हा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रासाठी गौरवाचा विषय आहे.
श्रीक्षेत्र माहूर येथील निलेश शास्त्री केदार यांच्या प्रमुख आयोजनात कृष्ण यजुर्वेद घनपाठी चंद्रशेखर द्राविड, काशी येथील पाठक क्लासेसचे संचालक प्रदीप पाठक व आश्रमातील विद्यार्थी या उपक्रमासाठी परिश्रम घेत आहेत.
भारतीय संस्कृती, वेदवाङ्मयावर प्रेम करणाèया नागरिकांनी 30 नोव्हेंबरपर्यंत चालणाèया या 50 दिवसीय उपक्रमाचा एकदा तरी अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.