वर्धा,
Wardha has 2.76 lakh voters जिल्ह्यातील सहा नगरपरिषदांसाठी निवडणुकीची धूम सुरू झाली आहे. जिल्ह्यातील ६ नगरपरिषदांमध्ये १ लाख ३७ हजार १२२ पुरुष, १ लाख ३८ हजार ८५६ महिला आणि इतर ९ असे २ लाख ७६ हजार ६८७ मतदार ६ नगर पालिकांचे नगराध्यक्ष आणि १६६ नगरसेवक निवडतील. यासाठी ३२८ मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. वर्धा नगरपरिषदेत २० प्रभागातून ४० नगरसेवकांची निवड केली जाईल. यामध्ये ४३ हजार १३८ पुरुष, ४४ हजार ८६६ महिला आणि इतर ९ असे ८८ हजार १३ मतदार ९९ मतदान केंद्रांवर मतदान करतील. हिंगणघाटमध्ये २० प्रभागांमधून ४० नगरसेवक निवडले जाणार आहेत. १०५ मतदान केंद्रांवर ४७ हजार २६५ पुरुष आणि ४७ हजार ९१ महिला असे ९४ हजार ३५६ मतदार मतदान करणार आहेत. आर्वीमध्ये १२ प्रभागांमधून २५ नगरसेवक निवडले जाणार असून १८ हजार २१९ पुरुष आणि १८ हजार १८८ महिला असे ३६ हजार ४०७ मतदार ४६ केंद्रांवर मतदान करतील.
पुलगाव नगर परिषदेत १० प्रभागांमधून २१ नगरसेवक निवडले जाणार आहेत. यात १४ हजार १९९ पुरुष आणि १४ हजार १६६ महिला असे २९ हजार ६५ मतदार ३५ मतदान केंद्रांवर मतदान करतील. देवळी नगरपंचायतमध्ये १० प्रभागांमधून २० नगरसेवक निवडून येणार आहेत. २४ मतदान केंद्रांवर ८ हजार १६७ पुरुष आणि ८ हजार २९१ महिला असे १६ हजार ४५८ मतदार मतदान प्रक्रियेत सहभाग घेणार आहेत. सिंदी रेल्वे नगरपालिकेत १९ मतदान केंद्रांवर ६ हजार १३४ पुरुष आणि ६ हजार २५४ महिला असे १२ हजार ३८८ मतदार नगराध्यक्ष आणि नगरसेवकांना निवडून आणणार आहेत.
३६४ कंट्रोल तर ७२८ बॅलेट युनिट तयार
सहा नगरपरिषदांच्या ३२८ मतदान केंद्रांसाठी ३६४ युनिट कंट्रोल (सीयू) आणि ७२८ बॅलेट युनिट (बीयू) तयार करण्यात आल्या आहेत. वर्धा येथे १०९ सीयू आणि २१८ बॅलेट युनिट, हिंगणघाट ११६ सीयू आणि २३२ बीयू, आर्वी येथे ५१ सीयू आणि १०२ बीयू, पुलगाव येथे ३९ सीयू आणि ७८ बीयू, देवळी येथे २७ सीयू आणि ५४ बीयू आणि सिंदी रेल्वे नगरपरिषदेत २२ सीयू आणि ४४ बॅलेट युनिट तयार ठेवण्यात आले आहेत. सर्व नगरपरिषदांच्या मतदानासाठी १० टके अतिरित मतदान साहित्य देखील तयार ठेवण्यात आले आहे. ३६ कंट्रोल युनिट आणि ७१ बॅलेट युनिट राखीव ठेवण्यात आले आहेत.