तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
sandeep-bajoria : मी प्रामाणिक माणूस आहे, आतापर्यंत शरद पवार राष्ट्रवादी पक्षात प्रामाणिक काम केले. मात्र, 8 जुलै रोजी पक्षाचा राजीनामा दिला असून, अद्यापही कोणत्याच पक्षात प्रवेश केला नाही. मी जनतेचा सेवक आहे, म्हणून जनतेची सेवा करण्यासाठी 2029 ची निवडणुकीची तयारी करत असल्याची माहिती बुधवार, 12 नोव्हेंबर रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत माजी आमदार संदीप बाजोरीया यांनी दिली.
पुढे बोलताना बाजोरिया म्हणाले, आतापर्यंत यवतमाळ जिल्ह्यात पक्षाचे प्रामाणिक काम केले असून, जिल्हा परिषद, पंचायत समिती, कृषी उत्पन्न बाजार समितीसह इतर विविध ठिकाणी पक्षाची सत्ता आणली होती. मात्र, मी ज्यांना विविध पदावर बसवले त्यांनी मात्र, फक्त पैसे घेण्याचे काम केले आहे. माझ्या विरोधकांना माझे खुले आव्हान आहे, की त्यांनी जर माझ्याकडून पैसे घेतले नसेल तर त्यांनी नार्को तपासणीला समोर यावे.
शेतकèयांची बँक म्हणून जिल्हा मध्यवर्ती बँकेची ओळख आहे. या बँकेत मोठ्या प्रमाणात भरतीचा घोळ होत असल्याने ही भरती रद्द करण्यात यावी, मी निवडणूकीत जे मुद्दे घेतले आहे. तेच मुद्दे घेऊन काँग्रेसने निवडणूक लढवली होती. मात्र, अद्यापही शहरातील गुन्हेगारी कमी झाली नाही. शहराचा पाहिजे तसा विकाससुद्धा झाला नसल्याची टिका माजी आमदार संदीप बाजोरिया यांनी यावेळी केली.