गोदावरी अर्बनचा ‘सहकारिता कुंभ 2025’ मध्ये विशेष सन्मान

    दिनांक :12-Nov-2025
Total Views |
तभा वृत्तसेवा
यवतमाळ, 
godavari-urban : नॅशनल फेडरेशन ऑफ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स अँड क्रेडिट सोसायटीच्या वतीने विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे झालेल्या भव्य सहकारिता कुंभ-2025 या आंतरराष्ट्रीय अधिवेशनात गोदावरी अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक या संस्थेच्या कार्याचा विशेष सन्मान करण्यात आला.
 
 

y12Nov-Godavari 
 
 
 
या अधिवेशनाचे उद्घाटन केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी कर्नाटकाचे कायदे मंत्री एचके पाटील तसेच सहकार मंत्रालयाचे सचिव डॉ. अशिष कुमार भूटानी, नॅशनल फेडरेशन ऑफ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स अँड क्रेडिट सोसायटीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत दास, उपाध्यक्ष मिलिंद काळे, एनयुसीएफडीसीचे अध्यक्ष ज्योतिंद्र मेहता यांची उपस्थिती होती.
 
 
या राष्ट्रीय अधिवेशनाच्या चर्चासत्रात व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर यांनी सहकारी संस्थांची अर्थव्यवस्थेतील भूमिका अधोरेखित करत, मल्टीस्टेट आणि पतसंस्थांसाठी स्वतंत्र छत्र संस्था स्थापन करण्याची व ठेवीदारांच्या सुरक्षेसाठी राष्ट्रीय संरक्षण निधी निर्माण करण्याची मागणी केली.
 
 
या अधिवेशनात देशभरातील अग्रगण्य सहकारी संस्था, बँका आणि क्रेडिट सोसायट्यांनी सहभाग घेतला होता. यामध्ये गोदावरी अर्बनने या संस्थेने गेल्या 11 वर्षांच्या उल्लेखनीय प्रवासाची आणि प्रगतीच्या आलेखाची प्रभावी चित्रफीत सादर केली. या अधिवेशनात गोदावरी अर्बनच्या कार्याचा विशेष उल्लेख करत संस्थेच्या सहकारातील नाविन्यपूर्ण दृष्टीकोनाचे कौतुक करण्यात आले. सहकार क्षेत्रातील डिजिटल परिवर्तन, आर्थिक समावेशन आणि ग्रामीण व शहरी संतुलन साधण्यात गोदावरी अर्बनने केलेल्या भरीव योगदानाची दखल घेण्यात आली.
 
 
गोदावरी अर्बनचे संस्थापक अध्यक्ष आमदार हेमंत पाटील, अध्यक्ष राजश्री पाटील यांच्या नेतृत्वाखाली व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर यांच्या नियोजनात ही संस्था आज राज्यातील तसेच राष्ट्रीय सहकार क्षेत्रात आदर्श ठरत आहे.
 
 
सहकारिता कुंभातील या विशेष सन्मानामुळे गोदावरी अर्बनचा विश्वास, प्रगती आणि सहकार हा संदेश संपूर्ण देशभर झळकला आहे. या आधिवेशनात गोदावरी अर्बनने सक्रिय सहभाग घेतल्यामुळे संस्थेचे संस्थापक आ. हेमंत पाटील व अध्यक्ष राजश्री पाटील यांचे अभिनंदन करण्यात आले.
 
 
यावेळी संस्थेच्या उपाध्यक्ष हेमलता देसले, व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर, सचिव रवींद्र रगटे, संचालक प्रा. सुरेश कटकमवार, वर्षा देशमुख, अजय देशमुख, उपसरव्यवस्थापक रवी इंगळे, उपसरव्यवस्थापक विजय शिरमेवार, विपणन अधिकारी महेश केंद्रे, व्यवस्थापक प्रशांत कदम, उपव्यवस्थापक संदीप बोरगेमवार, अनिकेत मोहदरे, रूपाली नेरुळकर, राजकौर, महानंदा कदम, हरीश इंदूरकर उपस्थित होते.