डॉ. नीलिमा दवणे यांची चमू व्यवस्थापक म्हणून निवड

    दिनांक :12-Nov-2025
Total Views |
तभा वृत्तसेवा
वणी, 
neelima-davane : केंद्र शासनाच्या युवा व क्रीडा मंत्रालयाच्यावतीने अटलबिहारी वाजपेयी इन्स्टिटएूट ऑफ माऊंटनेअरिंग अ‍ॅन्ड इलाईट स्पोर्ट, कुलू, मनाली हिमाचल प्रदेश येथे 15 ते 24 नोव्हेंबर दरम्यान होणाèया राष्ट्रीय साहसी शिबिरामध्ये संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे सहा स्वयंसेवक विद्यार्थी सहभागी होणार आहेत. यामध्ये तीन विद्यार्थी व तीन विद्यार्थिनींसह महिला रासेयो कार्यक्रम अधिकारी यांचा समावेश आहे. या राष्ट्रीय साहसी शिबिरात डॉ. नीलिमा दवणे यांची चमू व्यवस्थापक म्हणून निवड करण्यात आली आहे.
 
 
y12Nov-Nilima-Dawane
 
या शिबिरात महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय, अमरावतीचा अनिकेत सवाई, बाबाजी दाते कला व वाणिज्य महाविद्यालय यवतमाळचा पवन कुंभेकर, लोकमान्य टिळक महाविद्यालय वणीचा रोहित वाबीटकर, ब्रिजलाल बियाणी विज्ञान महाविद्यालयाची श्रध्दा यादव, आरएलटी विज्ञान महाविद्यालय अकोलाची ऐश्वर्या घुगरे, जेडी पाटील सांगळुदकर महाविद्यालय, दर्यापूरची गौरी कडू तसेच लोकमान्य टिळक महाविद्यालय वणी येथील रासेयो कार्यक्रम अधिकारी चमू व्यवस्थापक डॉ. निलिमा दवणे यांचा यात सहभाग राहणार आहे.
 
 
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. मिलींद बारहाते यांनी ही बाब विद्यापीठाकरिता अभिमानाची व गौरवास्पद असून विद्यापीठाचे नाव उंचावणारी असल्याचे सांगून सर्व स्वयंसेवक विद्यार्थ्यांचे कुलगुरूंनी अभिनंदन केले. प्र-कुलगुरु डॉ. महेंद्र ढोरे, कुलसचिव डॉ. अविनाश असनारे, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. निलेश कडू यांनी सर्व स्वयंसेवक विद्यार्थ्यांचे अभिनंदन करुन पुढील वाटचाली करिता शुभेच्छा दिल्या.
 
 
शिक्षण प्रसारक मंडळ वणीचे अध्यक्ष विजय मुकेवार, उपाध्यक्ष नरेंद्र बरडिया, सचिव सुभाष देशमुख, सहसचिव अशोक सोनटक्के, संपूर्ण संचालक, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रसाद खानझोडे, प्राध्यापक व कर्मचाèयांनी रोहित वाभिटकर आणि डॉ. नीलिमा दवणे यांचे कौतुक केले.