वणी,
yogeshwari-donekar : वणी पब्लिक स्कुलची दहावीची विद्यार्थिनी योगेश्वरी प्रशांत डोणेकर हिने यवतमाळ येथे आयोजित जिल्हास्तर चॅम्पियन स्पर्धेत 17 वर्षांखालील गटात प्रथम स्थान पटकावले आहे. शाळेचे क्रीडा शिक्षक सय्यद अदनान यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेतले आहे. प्राचार्य राकेश देशपांडे, संस्थेचे सचिव ओमप्रकाश चचडा व सदस्य विक्रांत चचडा यांनी योगेश्वरीचे अभिनंदन करून तिचा सत्कार केला व तिला पुढील वाटचालीसाठी प्रोत्साहन दिले.