युतीसाठी प्रयत्न, नाही तर मैत्रीपूर्ण

युवा स्वाभिमानच्या बैठकीत निर्णय

    दिनांक :12-Nov-2025
Total Views |
अमरावती, 
amaravti-news : भाजपासोबत युतीसाठी प्रयत्न करा नाही झाली तर मैत्रीपूर्ण लढत करू असा निर्णय युवा स्वाभिमान पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत घेण्यात आला. आता भाजपा काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
 
 
 
jkl
 
 
 
नगर पंचायत व नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी युवा स्वाभिमान पार्टीच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकार्‍यांनी कंबर कसली आहे. नुकतीच आ. रवी राणा यांच्या उपस्थितीत युवा स्वाभिमान पार्टीची आढावा बैठक झाली. यावेळी प्रामुख्याने सुनील राणा, जयंत वानखडे, शैलेंद्र कस्तुरे, अ‍ॅड. नंदेश अंबाडकर, विनोद जायलवाल, प्रा. अजय गाडे, समाधान वानखडे, डॉ. आशिष मालू, कमल किशोर मालानी, ज्योती सैरीसे, सोनाली नवले, सुमती ढोके, संजय हिंगासपुरे, शिवदास घुले, गणेशदास गायकवाड, सुखदेव तरडेजा, हरीश चरपे, बाळु इंगाले उपस्थित होते.
 
 
बैठकीमध्ये निवडणुकीत उमेदवार उभे करण्यासंदर्भात विशेष म्हणजे युती करण्यावर चर्चा करण्यात आली. चर्चेदरम्यान सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकमताने ठराव करुन निर्णय घेतला की, भाजपा हा आपला मोठा भाऊ असून जास्ती जास्त ठिकाणी भाजपासोबत युती करण्यावर कार्यकर्त्यांनी एकमत केले. त्यासंदर्भात याआधीच भाजपाचे राज्य निवडणूक प्रमुख चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव युती करण्यासंदर्भात प्रस्ताव सुद्धा देण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले. जर यदा कदाचित युती झाली नाही तर आम्ही सन्मानपुर्वक मैत्रीपूर्ण संपुर्ण जागा लढण्यासंदर्भात सुद्धा यावेळी उपस्थितांचे एकमत झाले.
 
 
शेवटी युती संदर्भात अंतिम निर्णय रवि राणा घेतील असेही वरिष्ठ पदाधिकार्‍यांनी स्पष्ट केले. या बैठकीमध्ये राजेंद्र गुर्जर, नितीन बोरेकर, गंगाधर आवारे, नाना आमले, सचिन भेंडे, संजय मुनोत, दिनेश सेठिया, प्रा.सतीश खोडे, किशोर पिवाल, दादाराव महल्ले, विनोद गुहे, मंगेश इंगोले, आशिष कावरे, विलास वाडेकर, रामकुमार खैरे, उमेश डकरे, राजकुमार बैस, अजय घुले, अविनाश काळे, श्रीकांत इंगळे, रत्नाकर चरडे, दिपक जलतारे, सुधिर लवणकर, पवन हिंगणे, प्रा.प्रभाकर अंबाडकर, शुभम उंबरकर, धर्मेश पारेख, आतिश इंगळे व असंख्य पदाधिकारी उपस्थित होते.