विद्यापीठाविरुद्ध एबीव्हीपीचा धडक मोर्चा आज

- ५ हजार विद्यार्थ्यांचा राहणार सहभाग

    दिनांक :13-Nov-2025
Total Views |
नागपूर, 
abvps protest march अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (एबीव्हीपी) विदर्भ प्रांताच्या वतीने गुरुवार, १३ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता राष्ट्रसंत महाराज नागपूर विद्यापीठावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाची सुरुवात रवी नगर ग्राउंड, रवी नगर चौक येथून होणार असून विविध महाविद्यालयातील ५ हजार विद्यार्थी सहभागी होणार आहेत.
 
 

abvp  
 
या मोर्चात प्रवेश, परीक्षा, निकाल, पाठ्यक्रम, शिष्यवृत्ती, वसतिगृह, एनईपी क्रियान्वयन आणि छात्रसंघ निवडणुका या प्रमुख मागण्या असतील. यावेळी ’छात्रशक्ती एकत्र आली प्रशासन हलवू शकते. शिक्षण हे फक्त भविष्याची तयारी नाही, तर तेच खरे जीवन आहे, असे सांगत अभाविपने हा मोर्चा प्रशासनाला जागे करण्याचा इशारा दिला आहे.abvps protest march विद्यार्थ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करणार्‍या प्रशासनाविरोधात हा मोर्चा ऐतिहासिक ठरेल, असा दावा एबीव्हीपीच्या पदाधिकार्‍यांनी केला आहे.