कृउ बाजार समिती वाढोणा येथे कापूस खरेदीचा शुभारंभ

    दिनांक :13-Nov-2025
Total Views |
तभा वृत्तसेवा
राळेगाव, 
agricultural-produce-market-committee : कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत येणाèया वाढोणा बाजार समितीत कापूस खरेदीचा शुभारंभ झाला.
 
 
j
 
कापूस भावावरून शेतकरी व व्यापारी यांच्यात तणाव निर्माण झाला होता. परंतु कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुधीर जवादे, अंकुश मुनेश्वर, गजानन पारखी तसेच वाढोणा बाजारचे माजी उपसरपंच प्रकाश पोपट यांच्या मध्यस्थीने वाद मिटविण्यात आला. सकाळपासून विमल अ‍ॅग्रो कॉटन जिनिंग व मीरा कोटेक्स जिनिंग येथे शेकडो वाहनांसह कापूस खरेदीसाठी गर्दी झाली. व्यापाèयांकडून सरसकट 6850 प्रति क्विंटल दराने खरेदीला सुरुवात झाली. तथापी, शेतकèयांनी 7 हजार प्रति क्विंटल दराची मागणी केली होती.
 
 
कापसात 25 ते 30 टक्के ओलावा असल्याचे कारण देत व्यापाèयांनी कमी दर दिल्याने शेतकèयांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. सततची नापिकी आणि आसमानी संकटामुळे शेतकरी हतबल झाला असून, शासनाने हमीभावात खरेदी होऊ न देण्याची मागणी शेतकèयांकडून केली जात आहे.
शेतकèयांची पिळवणूक थांबवा
 
 
सीसीआयकडून कापूस खरेदीस अद्याप सुरुवात झाली नसल्याने खाजगी व्यापारी शेतकèयांची पिळवणूक करीत आहेत. त्यामुळे शासनाने त्वरित सीसीआय कापूस खरेदी सुरू करावी, ही आमची ठाम मागणी आहे.
- सुधीर जवादे,
कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक, राळेगाव