अमरावती,
bjp-aggressive-over-islam-poster शहरातल्या पंचवटी चौकासह अन्य काही ठिकाणी बुधवार १२ नोव्हेंबरला सांयकाळी झळकलेल्या ‘विचारा इस्लामविषयी’ या पोस्टरवरून भाजपा आक्रमक झाली आहे. कोणाचीही परवानगी न घेता हे बॅनर लागले असल्याने लावणार्यांना व त्यांच्या नेत्यांना शोधून तातडीने कारवाई करण्याची मागणी भाजपाने पोलिस आयुक्तांकडे केली. दिड महिन्यापूर्वी याच पद्धतीने शहरात ‘आय लव्ह मोहम्मद’चे बॅनर झळकले होते. तेव्हाही भाजापाने आवाज उठविला होता.

खा. डॉ. अनिल बोंडे, भाजपाचे शहराध्यक्ष डॉ. नितीन धांडे, प्रवक्ता शिवराय कुळकर्णी यांच्या नेतृत्वात भाजपाचे प्रमुख पदाधिकार्यांचे शिष्टमंडळ पोलिस आयुक्तालयावर धडकले. त्यांनी उपस्थित दोन्ही पोलिस उपायुक्तांना जाब विचारला. पंचवटी चौकातले पोस्टर तर एका पोलिसासमोर लावण्यात आले तरी सुद्धा त्याने आक्षेप घेतला नाही. वरिष्ठांना सुद्धा माहिती दिली नाही. ही कृती म्हणजे शहरातले सामाजिक वातावरण बिघडविणार्यांना प्रोत्साहन देणारी आहे. पोलिसांनी दिसता क्षणीच कारवाई सुरू करायला हवी होती. आमच्या मागणीची वाटही पाहायला नको होती. bjp-aggressive-over-islam-poster पोस्टरवर जो नंबर दिला आहे, त्यावर फोन करून काही चौकशी केली का, असा प्रश्न पोलिसांना विचारल्यावर त्यांनी नाही, असे सांगताच खा. बोंडे म्हणाले, तुमचे काम मी केले पण, समोरच्या व्यक्तीने माझ्या प्रश्नाचे उत्तर दिले नाही. या प्रकरणाची सखोल चौकशी करा. शहराच्या सामाजिक वातावरणाला नख लावण्याचा व चिथावणी देण्याचा हा प्रकार आहे. पोस्टरमागच्या सुत्रधाराला शोधून काढा व कठोरशिक्षा द्या, अशी मागणी भाजपाने केली.
१२ नोव्हेंबर २०२२ रोजी रझा अकादमीने अमरावतीत दंगा घडवला होता. काल बरोबर याच दिवशी भर हिंदू वस्तीत ’विचारा इस्लामविषयी!’ हे पोस्टर लावण्यात आले आहे. गाडगे नगर स्थित पंचवटी चौकात हे पोस्टर लावण्याचा अर्थ काय? लव जिहादच्या घटना जाणीवपूर्वक घडवलेल्या अमरावती जिल्ह्यात पुन्हा जबरीने धर्मांतरण घडवून आणण्याचा या मागे डाव आहे का? असे अनेक प्रश्न भाजपाने उपस्थित केले. स्व. उमेश कोल्हे यांच्या ’सर तन से जुदा’ अंतर्गत झालेल्या भीषण हत्याकांडामुळे अमरावतीचे सामाजिक सौहार्दाचे वातावरण खराब केल्यानंतर आता पुन्हा अमरावतीचा माहोल खराब करण्याचे काम सुरु झाले असून वेळीच कठोर उपाययोजना करण्याची मागणी भाजपाने निवेदनातून केली आहे. bjp-aggressive-over-islam-poster निवेदन देतेवेळी बादल कुळकर्णी, राधा कुरील, सुधा तिवारी, विक्की शर्मा, कौशिक अग्रवाल, लता देशमुख, रिता मोकलकर, राजू कुरील, योगेश वानखडे, मंगेश खोंडे, राजू मेटे यांच्यासह अन्य पदाधिकारी हजर होते.