मद्यधुंद चालकावर गुन्हा दाखल

*वाहतूक पोलिसांची कारवाई : कर्नकर्कश १२ सायलेंसर जप्त

    दिनांक :13-Nov-2025
Total Views |
वर्धा, 
case-registered-against-drunk-driver वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांनी धडक कारवाई करीत मद्यधुंद अवस्थेत दुचाकी चालविणार्‍यावर गुन्हा दाखल केला. सोबतच तब्बल १२ कर्नकर्कश सायलेंसर जप्त केले. ही कारवाई गुरुवार १३ रोजी करण्यात आली.
 
 
case-registered-against-drunk-driver
 
गुरुवारी आर्वी नाका चौकात वाहतूक पोलिस अंमलदार कर्तव्य बजावत असताना एक दुचाकी चालक हा अतिवेगाने वाहन चालवित असल्याचे निदर्शनास आले. त्या वाहनास पोलिसांनी थांबवून पाहणी केली असता चालक दारूच्या नशेत असल्याचे पुढे आले. त्यानंतर त्याची वैद्यकीय तपासणी केली असता तो मद्यधुंद अवस्थेत असल्याचा अहवाल डॉटरांनी दिला. त्यानंतर पोलिसांनी संबंधित एम. एच. ३२ ए. एम. ५१२६ क्रमांकाच्या दुचाकीचा चालक स्वप्नील शेडमाके रा. आर्वी नाका, साने गुरुजीनगर वर्धा याच्याविरुद्ध मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. सोबतच दुचाकीही जप्त केली. case-registered-against-drunk-driver वाहतूक पोलिसांनी कुठल्या दुचाकींना मोठ्या आवाजाचे आणि फटाके फोडणारे सायलेंसर आहेत काय, याबाबत विशेष मोहीम राबवून वाहनांची तपासणी केली असता १२ दुचाकींना कर्नकर्कश सायलेंसर असल्याचे पुढे आले. या वाहन चालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई करून १२ कर्नकर्कश सायलेंसर जप्त केले. ही कारवाई सहायक फौजदार संजय भांडेकर, सय्यद शब्बीर, संजय कामडी, आशिष देशमुख यांनी केली.