देवळी,
chief-minister-panchayat-raj-mission दिगडोह येथील महिला, पुरुषांनी एकत्र येत ‘गाव करी ते राव न करी’ या म्हणीचा प्रत्यय देत मुख्यमंत्री पंचायतराज अभियानांतर्गत एकजुटीचे दर्शन घडविले. तब्बल १२० महिला व पुरुषांनी श्रमदान करून वनराई बंधारा उभारला. या उपक्रमाने ग्रामविकासाची नवी दिशा दाखविली.
उन्हाळ्यात जमिनीतील पाण्याची पातळी स्थिर राहावी, जनावरांना मुबलक पिण्याचे पाणी मिळावे तसेच हेच पाणी शेतीच्या कामी यावे, या उद्देशाने वनराई बंधारा महत्त्वाचा ठरतो. त्यामुळे पाणी अडवा, पाणी जिरवा हा उपक्रमही गेल्या काही वर्षांत राबविला जात आहे. मुख्यमंत्री पंचायतराज अभियानांतर्गत दिगडोह येथे गावातील महिला आणि पुरुषांच्या श्रमदानातून येथील वनराई बंधारा उभारण्यात आला. त्यानंतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण करण्यात आले. दोन ट्रॉली माती पसरवून परिसरात वृक्ष लागवड करण्यात आली. पर्यावरण संरक्षणाचा संदेश देत गावात फिरून प्लॅस्टिक गोळा करून प्लॅस्टिक बंदीची अंमलबजावणी करण्यात आली. chief-minister-panchayat-raj-mission तसेच बचत गटांच्या माध्यमातून कापडी पिशव्यांचे उत्पादन सुरू असून लवकरच त्यांचे वाटप करण्यात येणार आहे. माझे स्वच्छ गाव सुंदर गाव, हा नारा देत ग्रामस्थांनी शाळा, अंगणवाडी, ग्रामपंचायत परिसरासह संपूर्ण गाव स्वच्छ केले. या श्रमदान उपक्रमात गावाने एकोप्याचे उत्तम उदाहरण घालून दिले. या कार्यात सरपंच माधुरी कापसे, ग्रामपंचायत अधिकारी सारिका उंबरकर, उपसरपंच सुवर्णा मडावी, पंचायत सदस्यगण श्याम कापसे, कर्मचारी सुरेश डुकरे, ग्रामरोजगार सेवक गणेश डुकरे, महिला बचत गट सी. आर. पी. अंजली जबडे, सुनीता राठोड, मनीषा देऊळकर, शोभा आदमने, सोनू लोखंडे, मंदा येसनखेडे, ममता दांडेकर तसेच सर्व बचत गटांच्या अध्यक्ष, सचिव व महिलांनी सक्रिय सहभाग नोंदविला. महिलांनी श्रमदानातून एकतेचा व विकासाचा नवा आदर्श निर्माण केला.