चामोर्शी,
Cricket players felicitated नॅशनल क्रिकेट लीगसाठी निवड झालेल्या चामोर्शी तालुक्यातील खेळाडूंचा भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार डॉ. देवराव होळी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. हैद्राबाद येथे नँशनल क्रिकेट लीग साठी निवड चाचणी घेण्यात आली होती. त्यामध्ये एकूण 5 राज्याच्या खेळाडूंनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये महाराष्ट्रातून गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील निवड झालेल्या अंडर-12 मध्ये रणबीर पवार, स्व्रीकूत पोरेड्डीवर, रुद्र नैताम, वंश वाढई, अंडर-14 मध्ये परी उंदिरवाडे, तेजस माळवे, सुजल कुंघाडकर, अंडर-16 मध्ये हर्ष तन्नेरवार, सान्वीत काळवाजीवर यांची नँशनल लीग दिल्लीसाठी निवड झाली आहे. तसेच वंश सुधाकर वाढई यांचा विदर्भ क्रिकेट असोसिएशनमध्ये अंडर 12/ साठी निवड झाली आहे. या निवडडीबद्दल डॉ. देवराव होळी यांनी त्यांचा सत्कार केला.

यावेळी डॉ. देवराव होळी यांनी निवड झालेल्या खेळाडूंना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देताना त्यांनी गडचिरोली जिल्ह्यातील क्रिकेट प्रतिभेला प्रोत्साहन मिळावे यासाठी विशेष मागणी केली. त्यांनी सांगितले की, लॉयड्स मेटल्स लिमिटेड कंपनीकडून गडचिरोली जिल्ह्यात ‘गडचिरोली प्रीमियम लीग’ स्पर्धा आयोजित केली जाते. त्याच धर्तीवर अंडर-19 मुला-मुलींसाठी स्वतंत्र स्पर्धा आयोजित केल्यास जिल्ह्यातील उदयोन्मुख खेळाडूंना आपली प्रतिभा दाखवण्याची संधी मिळेल. गडचिरोलीचे खेळाडू राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर नावलौकिक मिळवतील, असे त्यांनी नमूद केले. डॉ. होळी यांनी यासाठी लॉयड्स मेटल्स कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन यांची भेट घेऊन मागणी करणार असल्याचेही सांगितले. तसेच प्रशिक्षक दिलिप नैताम, विजय शेंडे, नितीन शेंडे, दिलिप सैने आणि विशेष मार्गदर्शक अय्याज शेख व डॉ. पवन नाईक यांचे विशेष आभार मानले.