तभा वृत्तसेवा
उमरखेड,
md-medicine : उमरखेड नगरीचे भूमिपूत्र नाडी परीक्षण करणारे विठ्ठल चौधरी यांचे नातू, डॉ. गजानन अशोक चौधरी यांनी पदव्युत्तर एमडी (जनरल मेडिसीन) वैद्यकीय शिक्षण प्रावीण्यासह उत्तीर्ण केले आहे. त्यांनी त्यांचे पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण जनरल मेडिसीन-शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय सिलचर, आसाम येथे पूर्ण केले. एमबीबीएस इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नागपूर येथे पूर्ण केले.
त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण गोपिकाबाई सीताराम गावंडे महाविद्यालय उमरखेड येथे तर शालेय शिक्षण गुरुदेव गोरोबा विद्या मंदिर उमरखेड येथे पूर्ण झाले. अल्पभूधारक असलेल्या एका सामान्य शेतकरी कुटुंबातून आलो. उमरखेड नगरीत घडलो आणि आपण आपल्या गावासाठी काही देणं लागतो, अशी त्यांची नि:स्वार्थ भावना आहे. त्यांनी कठोर परिश्रम आणि प्रबळ ईच्छाशक्तीच्या जोरावर हे यश संपादन केले. वैद्यकीय क्षेत्रात घेतलेल्या भरारीबद्दल डॉ. गजानन चौधरी यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.